झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रमप्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधीलमोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. याआधीही थुकरटवाडीमध्ये शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, इरफान खान, अजय देवगण, रितेश देशमुख यासारख्यामंडळींने हजेरी लावली आहे आणि आता दुसऱ्यांदा या मंचावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान आणि किरण राव येणार आहेत.

या मंचावर येऊन आमिर खानने सर्वच कलाकारांशी त्याच्या खास स्टाईलनं संवाद साधला. सेटवर लाडक्या विनोदवीरांनी रंगीला या चित्रपटावर एक स्कीट सादर केलं. एवढंच नाहीतर कार्यक्रमातआमिर खान आणि किरण राव या दोघांनी एक स्किट सादर केलं आणि त्यासाठी ते दोघंही गावकरी बनले. पाणी कसं वाचवावं आणि त्याचा साठा कसा करावा यावर माहिती देणारं स्किट आमिर खानआणि किरण राव यांनी सादर केलं आणि त्यासाठी त्यांनी मराठमोळा वेष परिधान केला. इतकंच नव्हे तर आमिर खानने त्याचा आणि किरणचा या लूकमधील फोटो सोशल मीडियावर टाकला आणि हाफोटो प्रचंड व्हायरल होतोय. हा भाग १ आणि २ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.