काही लोकं इतर सणांपेक्षा गटारी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. त्यामध्ये ‘चला हवा येऊ द्या’चे विनोदवीर कसे मागे राहतील? चला हवा येऊ द्या च्या मंचावर या आठवड्यात वन्स मोर आणि बाबा या चित्रपटातील कलाकार सज्ज झाले आहेत. त्यामुळे धमाल मजा मस्ती या बरोबरच थुकरट वाडीत आलेल्या या कलाकारांसोबत गटारीचं सेलिब्रेशन देखील तितक्याच जोशात होणार.या कलाकारांसाठी थुकरट वाडीतील विनोदवीर कर्ज या चित्रपटावर आधारित एक विनोदी सादर करणार आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट कर्ज पण थुकरट वाडीचा ‘कर्जबाजारी’ हा चित्रपट प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करेल. ज्यामध्ये भाऊ कदम मॉन्टी तर कुशल बद्रिके कामिनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.त्यामुळे हास्यकल्लोळ होणार होणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे हि धमाल आणि गटारीचं थुकरट वाडीतील हे धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला विसरू नका .‘चला हवा येऊ द्या’मध्ये सोमवार ते गुरवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.