राहिलेले ध्येय यावर्षी पूर्ण करा, यश तुमचच आहे.
२०१७ हे वर्ष खूप धावपळीचे आणि मस्त गेले. याच वर्षात माझी गाणी आणि दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘आम्ही पुणेरी’ , ‘फकाट पार्टी, ही गाणी आणि  ‘बघतोस काय मुजरा कर’ आणि ‘बसस्टाॅप’ हे सिनेमे प्रदर्शित झाले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलादेखील मी , ‘प्रभो शिsवाजी राजा’ या सचेतन चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता म्हणून लोकांसमोर येतोय. वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणारा तो माझा पहिला सिनेमा असून, यानंतर मी स्वत: लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट मी लवकरच घेऊन येत असल्यामुळे, मी खूप उत्सुक आहे. नववर्षाची धम्माल मी यंदा माझ्या कुटुंबांसोबतच करणार आहे. नवीन वर्षानिमित्त मी लोकांना एवढेच सांगेन कि, जी ध्येय गतवर्षी पूर्ण करायची राहिले असतील ती आगामी वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.  त्यावर सकारात्मकरित्या  लक्षकेंद्रित करा. यश नक्कीच तुमच असेल.
श्रेयश जाधव, मराठी रॅपर, निर्माता
‘ड्राय डे’ मार्फत डोंट ड्रिंक एंड ड्राईव्ह चा संदेश देणार
२०१७ मध्ये माझ्या ‘ड्राय डे’ या डेब्यू सिनेमाचे शुटींग होते. या सिनेमाच्या निमित्ताने अनेक मित्र मिळाली. चित्रपटाबरोबरच काही नाटकांचे प्रयोग सुध्दा चालू असल्यामुळे, हे वर्ष थोडं वेगळच होत.
२०१८ ला माझे दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत, त्यामुळे मी खूप उत्साही आहे. या वर्षी मी नवीन वर्षाच्या स्वागताला ‘ड्राय डे’ सिनेमाच्या टीमसोबत सांगलीला जाणार आहे. तेथे तरुणांना नववर्षानिमित्त ‘मद्यपान करून गाडी न चालवण्याचा सामाजिक संदेश देणार आहे.
ऋत्विक केंद्रे, अभिनेता
अभिनय क्षेत्रात शिक्षण घेण्याचा निर्णय
२०१७ हे वर्षं माझ्यासाठी खूप खास गेलं. कारण या वर्षी माझे तीन सिनेमे प्रदर्शित झाले. आणि वर्षाच्या अखेरीस माझा गच्ची हा सिनेमा लोकांसमोर झळकला आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. त्याचसोबत काही नाटकाचे प्रयोग सुद्धा केले. नवीन वर्षात अभिनय क्षेत्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच माझ्या वेब सिरीजचा दुसरा  भाग येणार आहे, तसेच काही सिनेमे देखील रांगेत आहे. त्यामुळे नवीन वर्षदेखील असेच कामात जाईल. या वेळेसची न्यू ईयर पार्टी मुंबई आणि पुण्याच्या बाहेर साजरी करण्याचा विचार आहे. ‘खूप झाडे लावा आणि पर्यावरणाचा अपव्यय टाळा’ असा संदेश मी वाचकांना देतो, शिवाय मी देखील त्याचे अनुकरण करणार आहे.

अभय महाजन, अभिनेता

अजून खूप चांगल काम करायचेय 

माझ्यासाठी २०१७ हे वर्षं खूपच मस्त आणि सुंदर गेलं. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच माझा गश्मीर महाजनी सोबतचा “मला काहीच Problem नाही” हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आलाआणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आता वर्षाअखेरीस माझाअंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडित सोबतचा “देवा” हा चित्रपट रिलीज झाला आहे. आणि या चित्रपटालासुद्धा प्रेक्षकांची चांगली दाद मिळत असूनहा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. २०१८ मध्ये मी स्वतःच्या तब्येतीकडे नीट लक्ष देणार आहेस्वतःला फिट आणि फाईन ठेवणार आहे. येत्या वर्षात माझे दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे मी नववर्षाची आतुरतेने वाट पाहतेय.  
स्पृहा जोशी, अभिनेत्री