एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले अभिनेते आता करोडोंच्या घरात अधिराज्य करतोय.महागड्या गाड्या,बंगले,संपत्ती सोबत त्यांच्या हौशी आश्चर्याचा धक्काही देतोय. ज्याचे कुतुहल सध्या जगभरात सर्वांच्याच तोंडी होते आहे. निव्वळ या कलाकारच्या एका एंट्रीने चित्रपट सुपर डूपर हिट होते, असे मानले जाते.

म्हणून सिनेमागृहातील प्रेक्षक टाळ्यांच्या गजराने नेहमीच ब्रम्हानंदमच स्वागत करतात. फक्त त्याला पाहताच लोक इतके पोट धरून हसतात, की पुढच्या कोणत्या बर आर्टीफिशल रचनेच्या स्क्रिप्टची गरज भासेल. जगभर ख्याती असलेला हा विनोद विर एका सिनेमासाठी तब्बल एक कोटी रूपये मानधन घेतो.

आपल्या मराठी चित्रपट सृष्ठीतल्या कैक सुपरस्टारांच्या दुपटी-तिपटीने जास्त म्हटलं तरी हरकत नाही. जेवढे त्याचे मानधन आहे तेवढच त्याच्या संपत्तीचे कौतूक सर्वत्र आहे.काॅमेडीअन ब्रह्मानंदम यांच्याजवळ Audi R8, Audi Q7, मर्सिडीज बेंज आणि इनोव्हासारख्या टाॅपक्लास गाड्या देखील आहेत.

याशिवाय करोडो रुपयांची शेत जमीनही त्यांच्या नावावर आहे. त्याच बरोबर ब्रह्मानंदम यांचा हैदराबादमधील उच्चभ्रू वसाहत जुबली हिल्स येथे एक आलिशान बंगला सुद्धा आहे. हे सद्या प्रचंड आकर्षणाच ठिकाण बनलय. साहजिकच प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर असलेला ब्रह्मानंदम प्रत्येक सिनेमांसाठी जास्त फी आकारणार. आता एक कोटीपेक्षा जास्त फी वाढण्याची देखील दाट शक्यता आहे.

एक हजारहून अधिक सिनेमात काम केलेल्या ब्रम्हानंदची एकूण संपत्ती 350 कोटीहून अधिक आहे. फक्त ३१ वर्षांच्या कारकिर्दीत एक हजारहून अधिक सिनेमे केल्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा याच्या नावावर आहे. सर्वाधीक सिनेमे करणारा मास्टर ब्लास्टरच जणू.

फक्त आर्थीक दृष्या नव्हे तर सिनेमातील प्रामाणीक अभिनया मुळेही त्यांना खुप मान दिला जातो. आता ब्रम्हानंदमची गाडी सुसाट सुरू आहे. त्याने मिळवेली प्रसिध्दी आणि रेकाॅर्ड्स हेच त्याच्या संपत्ती मागचे मोठे रहस्य आहे. ब्रम्हानंदमच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.