मित्रांनो!, गेल्या अनेक दिवसांपासून करीना एका चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी फी वाढवण्याच्या मागणीवरून चर्चेत आहे. बातमीनुसार, तिने या भूमिकेसाठी भरमसाठ फीची मागणी केली आहे. एका सूत्रानुसार, करीनाने चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आणि तिच्या या मागणीनंतर निर्माते आता तिच्या निर्णयावर पुनर्विचार करत आहेत. सोशल मीडियावरही करीनाला या मागणीसाठी खूप ट्रोल करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर अलीकडेच करीनाने या प्रकरणावर मौन सोडलं आहे. तिने सांगितलं, काही वर्षांपूर्वी, चित्रपटात पुरुष किंवा स्त्रीला समान वेतन मिळण्याविषयी कोणीही बोलत नव्हतं. मात्र आता आपल्यापैकी बरेच जण याबद्दल उघडपणे बोलत आहेत. पुढे करिना म्हणाली की, मला काय हवं आहे ते मला सांगायचं आहे आणि मला असं वाटतं की, महिलांना आदर दिला पाहिजे.
हे मागणी करण्याबद्दल नाही, ते महिलांच्या सन्मानाबद्दल आहे आणि मला वाटतं की, गोष्टी बदलल्या पाहिजेत. आम्ही तुम्हाला सांगू की, करीना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. दोघांच्या शूटिंगचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतो’, करीना कपूरला आता अशी धमकीसुद्धा मिळाल्याचे वृत्त आहे. तिनं एका पौराणिक चित्रपटासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची मागणी केलीय. या चित्रपटात ती भगवान श्री राम यांची पत्नी सीतेच्या भूमिकेत झळकणार होती. परंतु ही बातमी कळताच तिच्याविरोधात संतापाची लाट उसळली. करीना सीतेच्या भूमिकेसाठी योग्य नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्याविरोधात बायकॉट करीना (#BycottKareenaKapoorKhan) असा प्रचार सुरु केला.
हा प्रचार कमी होता की काय आता या वादात बजरंग दलानं देखील उडी घेतली आहे. जर का या चित्रपटात करीना कपूर झळकली तर या चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे. टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करीनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिलं आहे. जर करीना कपूरला घेऊन हा चित्रपट तयार करण्याचा घाट घातला गेला तर आम्ही त्याच्यावर बंदी घालू असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
शिवाय आपल्या निवेदनात त्यांनी करीनाचे बिकिनी फोटो आणि ती अजमेर दरगाहला गेलेली असतानाचे फोटो देखील दिले आहेत. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यानं प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “वारंवार हिंदू धर्मावरच चित्रपट का तयार केले जातात? शिवाय या चित्रपटांमध्ये मुस्लीम कलाकारांना महत्वाच्या भूमिका दिल्या जातात. ही मंडळी हिंदू देवतांच्या नावावर कोट्यवधी रुपये कमावतात. आणि नंतर आमच्याच देवांवर आणि संस्कृतीवर टीका करतात.
यापूर्वी करीना आणि तिचा पती सैफ अली खान यानं हे प्रकार अनेकदा केले आहेत. त्यामुळं अशा लोकांना आम्ही सीतेसारखी पवित्र भूमिका साकारु देणार नाही. आणि जर करीनासोबत हा चित्रपट तयार केला गेला तर त्याला विरोध केला जाईल. या संबंधीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे.”