मित्रांनो!, जसे की आपण सर्वजण जाणतोच की, अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स, रोजच हजारो लोक या स्वप्नांच्या जगात सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, किंवा मग वयोवृद्ध कलाकार. यातल्या अनेकांना आपल्या कलेच्या जोरावर म्हणा किंवा मग वशील्याचा जोरावर, मनासारखं काम मिळून जातं.

पण असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचात प्रतिभा असूनही चांगले रोल मिळत नाही.अशा परिस्थितीत मग या कलाकारांना तडजोड करावी लागते. ही तडजोड कोणत्याही रुपात असू शकते. काही कलाकारांना तर आपल्या वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका कराव्या लागतात. कारण या भूमिका करायला सहसा कोणी तयार होत नाही.

या बॉलीवूड मध्ये अशाही काही अभिनेत्र्या आहेत, ज्या अजूनही खूप तरुण आहेत. परंतु योग्य भूमिका न मिळाल्याने त्यांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला. ग्लॅमरस असून देखील त्यांनी चित्रपटात आईच्या किंवा तत्सम भूमिका स्वीकारल्या.

रम्या कृष्णन- राम्या कृष्णन ही तिच्या काळातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री होती. ‘बाहुबली’ चित्रपटात तिने माता शिवगामी देवीची भूमिका साकारली होती. 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारी रम्या खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश बोल्ड आणि मॉडर्न आहे.

अमृता सुभाष- मराठमोळ्या अमृता सुभाषने नुकत्याच आलेल्या रणवीर सिंग आणि आलिया भट्टची फिल्म गल्लीबॉय मध्ये रणवीरच्या आईची भूमिका केली होती. जरी अमृता चित्रपटात रणवीरची आई बनली असली तरी , ती वास्तविक जीवनात खूपच तरुण आहे. अमृतादेखील खूप ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

रिचा चड्ढा: अभिनेत्री रिचा चड्ढा ने मसान आणि गँग्स ऑफ वासेपुर सारख्या चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये मुख्य प्रवाहात स्वत:ला प्रस्थापित केले आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शीत गॅंग्स ऑफ वासेपुर मध्ये रिचाने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईची भूमिका साकारली होती. एका खाजगी मुलाखतीत तिने नमूद केले, “मला वाटले की माझे करियर गँग्स ऑफ वासेपुर नंतर संपले आहे. कारण या चित्रपटानंतर मला वयस्कर महिलेची इमेज तोडण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागले ”

सुप्रिया कर्णिक: 26 वर्षांच्या लहान वयात अभिनेत्री सुप्रिया कर्णिकने सुभाष घई यांच्या 2001 मधील दिग्दर्शित ‘यादे’ या चित्रपटात आईची भूमिका केली होती. वेलकम चित्रपटात तिने अक्षय कुमारच्या आंटीचीही भूमिका केली होती. सुप्रिया अजूनही खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

मेहेर विज- मेहर विज सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये दिसली होती. यात तिने मुन्नीच्या आईची भूमिका केली होती. चित्रपटात मेहेर विज जरी साध्या वेशात दाखवली असली तरी ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.

अर्चना जॉईस- वर्ष 2018 मध्ये रिलीज झालेल्या KGF चित्रपटात अर्चना जॉईसने अभिनेता यशच्या आईची भूमिका केली होती. आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती. परंतु खरं सांगायचं तर अर्चना खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आणि खूपच सुंदर दिसते. ही भूमिका करताना अर्चना फक्त 28 वर्षांची होती.