नव्वदीच्या दशकातली सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, रवीना टंडन. रवीनाने आपल्या अभिनयातील लकब दाखवत त्या काळात रसिकप्रेक्षकांच्या मनावर पुरेपूर अधिराज्य गाजवलं असं म्हणता येईल. रवीनाच्या विविध कामांमधून ती कायमच त्या काळातदेखील चर्चेत राहिली. आणि आत्ता देखील तिच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात.

“तू चिज बडी है मस्त मस्त” या गिताने रवीनाची त्या काळात असलेली चाहत्यांच्या मनातली क्रेझ अगदीच उच्च पातळीवर नेऊन ठेवली. आणि त्यानंतर तिला बॉलीवुडची “मस्त मस्त गर्ल” अशी ओळखदेखील मिळाली. रवीना टंडनबद्दल सध्याच्या घडीला बोलायचं म्हटलं तर ती सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असल्याची पहायला मिळते. आपले लेटेस्ट फोटोज, व्हिडिओज व इतर अनेक साऱ्या बाबी ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपल्या चाहत्यावर्गाशी शेअर करत असते.

आणि मुळातच एकेकाळी सर्वांना आपल्या अदांनी घायाळ करून जाणारी ही अभिनेत्री आता चक्क आज्जी झाली आहे. आणि अर्थातचं तिच्या या आनंदाला अक्षरश: पारावार उरला नाहीये, या गोष्टीची अनुभुती तुम्हाला तिच्या नातासोबतच्या व्हायरलं होतं असलेल्या व्हिडिओमधून पुरेपूर पहायला मिळते. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेकांचा अगदीच भन्नाट आणि चांगला प्रतिसाद येताना पहायला मिळत आहे.

खरतरं रवीना आज्जी झाली ती तिच्या छोट्या मुलीने “छायाने” नव्या बाळाला जन्म दिल्यानंतर. रवीना गेल्या वर्षीच आज्जी झालेली आहे. आणि रवीना आपल्या नातवाच्या सोबतच्या आठवणी व्हिडिओमधून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करताना पहायला मिळाली आहे. रूद्र असं रवीनाच्या नातवाचं आहे. आपल्या नातावासोबतची रवीनाची ही केमिस्ट्री सोशल मीडियावर सर्वांना अगदीच जास्त प्रमाणात आवडली आहे.

रवीना आपल्या नातवाला आपल्या हातात अलगद खेळवताना पहायला मिळते आहे. आपल्या मिठित व्यवस्थित त्याला घेऊन रवीना अगदी हर्षोल्लासित झाल्याची पहायला मिळते आहे. तुम्हाला रवीनाबाबत आणखी इतर गोष्टी सांगायच्या म्हणजे, रवीनाने तिची मुलगी राशा हिचा नुकताच १६ वा जन्मदिवस साजरा केला आहे.

रवीनाने तिच्या आयुष्यात दोन मुली दत्तक घेतलेल्या आहेत. रवीनाला एकूण तशी चार अपत्ये आहेत. रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनील थडाणी यांच्यासोबत २००४ या सालात लग्न केलं. छाया आणि पुजा या दोन तिने दत्तक घेतलेल्या मुली आहेत. मुळात छायाच्या नव्या आयुष्याची सुरूवात आणि वाटचाल योग्यरीतीने चालू आहे. छायाच्याच मुलासोबत रवीना आपलं “आज्जीपण” आनंदाने मनसोक्त उपभोगत असल्याचं दिसून येतं.

राशा आणि रणबीर हे अनील थडाणी यांच्यापासून झालेली रवीनाची दोन अपत्ये आहेत. रवीनाच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तिने अगदीच भन्नाट आणि हटके भुमिका बजावल्या आहेत. तिच्या गोविंदासोबतच्या अनेक भुमिका आजही रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.

रवीना त्या काळात एका अभिनेत्रीशिवाय एक उत्कृष्ठ डान्सरदेखील होती यात काहीच शंका नाही. रवीना टंडन सध्या “केजीएफ चाप्टर २” या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे. रवीनाने गेल्या वर्षी “नच बलीये सिजन ९” या पर्वाची जज म्हणूनदेखील भुमिका पार पाडली होती. काही असलं तरी रवीना आणि तिच्या नातवाच्या केमिस्ट्रीला रसिकप्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असलेला पहायला मिळतो आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!