सेलिब्रिटींसह नृत्य शिकण्याची तरुणाईला संधी

तरुण मंडळी सध्या नृत्यकलेतून वेगवेगळे प्रयोग आजमावताना दिसत आहेत. मग त्यामध्ये सांस्कृतिक आणि पाश्चिमात्य अशा नृत्यप्रकारांचाही समावेश असतो. हेशिकण्यासाठी अर्थातच मुलं क्लास आणि वेगवेगळ्या संस्थांना जोडले जातात. पण नेहमीच आपणही सिनेताऱ्यांच्यासोबत डान्स करावा ही ईच्छा मनात ठेवत असतात. जी मुलं मोठ्यादर्जाच्या व्यासपीठावर आपले नृत्यकौशल्य दाखवू इच्छितात त्या मुलांसाठी बॉलिवूडमधील प्रख्यात नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांचा एकवर्षीय  नृत्यअभ्यासक्रमाची सुरूवात केलीआहे. हा अभ्यासक्रमात बॉलिवूडजॅझ असे वेगवेगळ्या नृत्यप्रकार शिकवले जातील. तसेच डान्स व्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकासव्यासपीठावर आपण कशाप्रकारे लोकांसमोर आपलंकौशल्य दाखवावं याचे देखील प्रशिक्षण मिळणार आहे. १६ डिसेंबर पासून मुंबईत यासाठी ऑडिशनची सुरुवात होणार आहे.