बॉलिवुडमधील सिनेजगतात अगदी स्वत:च्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना कायमच घायाळ करून सोडणारी अभिनेत्री म्हणजे, उर्वशी रौतेला. उर्वशीच्या अदा सहसा अनेकदा नृत्याच्या कलेमधूनच रसिकप्रेक्षकांना पहायला मिळतात. याशिवाय तिच्या अभिनयाचीही प्रचिती आजवर बॉलीवुडच्या रसिकप्रेक्षकांनी घेतलेली पहायला मिळते. आपल्या अदाकारीच्या आणि अभिनयाच्या जोरावर सध्या उर्वशी रौतेला अनेक नवे प्रोजेक्ट्स स्वत:च्या नावावर करताना पहायला मिळतं आहे.

उर्वशी आता हिंदी व्यतिरिक्त तमीळ सिनेसृष्टीतदेखील पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्याची पहायला मिळते आहे. नुकतचं काही दिवसांपूर्वी उर्वशीने एक तमीळ सिनेमा करण्याची ऑफर स्विकारली आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु आजवर तमीळ सिनेसृष्टीत एखाद्या कोणत्याच अभिनेत्रीने एवढं मानधन घेतलं नसेल तितक्याच मोठ्या प्रमाणात मानधन उर्वशीने पहिल्याच सिनेमाकरता घेतलं आहे.

तिने तिच्या या कामाकरता चक्क १० कोटी रूपयांची आकारणी केल्याची बातमी मिळाली आहे. आणि या गोष्टीसोबतच आता उर्वशी तमीळ सिनेमासृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे. याआधी तमीळ भाषिक सिनेमांमधे याआधी एखाद्या कोणत्याच अभिनेत्रीने इतक्या मोठ्या प्रमाणावर मानधन घेतलेलं नाही.

त्यामुळे उर्वशीने एकप्रकारे हा नवा किर्तीमान स्थापन केलायं असं म्हणायला हरकत नाही. उर्वशीने अजूनतरी तिच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली पहायला मिळतं नाही. परंतु सिनेमाची शुटींग चालू झाल्याच्या गोष्टींचा अंदाजा आहे. असं सध्यातरी समजतं आहे की, उर्वशीचा विज्ञानावर अर्थात साय-फाय कथेवर आधारीत हा सिनेमा असणार आहे.

सध्याच्या घडीला तरी उर्वशी रौतेला हिच्या भुमिकेबद्दल थोडीशीच माहिती मिळाली आहे. ती तमीळ सिनेमातील तिच्या या प्रोजेक्टमधे एक आयआयटीयन मायक्रोबायोलॉजिस्टची भुमिका करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा इतरही विविध भाषांमधे रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचही समजलं आहे.

सध्याच्या घडीला उर्वशी कशा पद्धतीने या सिनेमातून दाक्षिणात्य रसिकप्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप उमटवते हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. उर्वशी रौतेला हिंदी सिनेसृष्टीत आजवर अनेक गाण्यांमधून, अल्बममधून आणि इतर काही सिनेमांमधून देखील रसिकप्रेक्षकांच्या भेटीस आलेली पहायला मिळाली आहे. उर्वशीला नुकतचं मनाली या ठिकाणी नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी स्पॉट केल्या गेलं होतं.

या सिनेमाचं अजून अर्ध्यापेक्षा अधिक शुटींग बाकी राहिल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय खास बात म्हणजे तमीळ सिनेमात पदार्पण करण्यासोबतच उर्वशी तेलुगू सिनेमातदेखील पाऊल ठेवताना पहायला मिळत आहे. “ब्लॅक रोझ” असं या सिनेमाचं नाव असून याचा पहिला लुक रसिकप्रेक्षकांसमोर आलेला आहे.

उर्वशी भविष्यात “थिरूत्तु पयाले – 2” या तमीळ सिनेमाचा रिमेक बनवल्या जाणाऱ्या सिनेमातदेखील दिसणार आहे. याखेरीज उर्वशीच्या नावावर एक वेबसिरीजदेखील आता येत असलेली पहायला मिळणार आहे. याचं नाव “इन्स्पेक्टर अविनाश” असं असणार आहे. सध्याच्या घडीला पहायला गेलं तर उर्वशीच्या करियरसाठी तिच्याकडे एकापेक्षा एक दर्जेदार कामांची वर्णी लागलेली पहायला मिळते आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!