आजकाल दर्जेदार हिंदी, व इतर भाषिक चित्रपट आणि वेब मालिका या दोन्ही माध्यमांमधून भारतातील घराघरात ओळखला जाणारा चेहरा म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड व मराठी अभिनेत्री राधिका आपटे. बॉलिवूडमध्ये आयुष्मान खुराना आणि तब्बू सोबतचा अंधाधून हा तिचा चित्रपट तुफान चालला.

या व्यतिरिक्त ती सेक्रेड गेम्स, घोल आणि लस्ट स्टोरीज या सुप्रसिद्ध वेब सिरीज मधेही दिसली होती. सामाजिक विषयांवर बिनधास्त आणि बेधडक मत प्रदर्शन करण्यात ती नेहमीच अग्रेसर असते. राधिका आपटे ही फक्त हिंदी चित्रपटांपुरती मर्यादित नसून ती हिंदी सोबतच तेलगू, तामिळ, मल्याळम, बंगाली, इंग्रजी आणि अगदी मराठी चित्रपटातही अभिनय करत असते.

राधिका आपटे जी भूमिका पडद्यावर साकारते त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देते आणि मग आपल्याला तिने साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये आणि अभिनयात एक जिवंतपणा जाणवतो आणि त्यामुळेच राधिका एक उत्तम अभिनेत्री आहे यात शंकाच नाही.

कोणताही चित्रपट निवडतांना ती मुख्यतः कथा हा घटक अत्यंत महत्वाचा मानते. मग तिचा रोल, व इतर महत्वाच्या गोष्टी. राधिकाला जर एखाद्या चित्रपटाची कथा आवडली तर मग तो कोणत्या प्रकारचा चित्रपट आहे हे ती बघत नाही. तिला विनोदी, भयपट, थ्रि’ल’र, रहस्यमय, रोमँटिक इ. सर्व प्रकारचे चित्रपट आवडतात.

विविध भाषांमधील चित्रपटात काम करतांना सुरुवातीला अनेकदा भाषेची खूप अडचण यायची. पण नंतर मात्र तिने सरावाने प्रयत्नपूर्वक निरनिराळ्या भाषां शिकून घेतल्या.

राधिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी जीवनाविषयी काही अनोख्या गोष्टी सांगितल्या. राधिका आपटे म्हणाली की “माझे लग्न हे रजिस्टर म्हणजेच नोंदणी पद्धतीने झाले. लग्नात मी माझ्या आजीची जुनी साडी घातली होती. ती साडी खूप जुनी असल्यामुळे जीर्ण होऊन काही ठिकाणी तिला छिद्रंही पडलेली होती. पण तरीही मी तीच जुनी फाटलेली साडीच घालणे पसंत केले, कारण माझी आजी ही माझ्यासाठी या संपूर्ण जगातील सर्वात प्रिय व्यक्ती आहे.

नवनवीन फॅशनच्या कपड्यांवर वारेमाप पैसे उडवणाऱ्या लोकांपैकी मी नक्कीच नाही. जरी माझे लग्न रजिस्टर्ड पद्धतीने होत होते तरी मला सुद्धा इतर मुलींप्रमाणे साजशृंगार करण्याची इच्छा होतीच आणि म्हणूनच मी माझ्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत नवीन ड्रेस घातला होता.

तुम्हाला ऐकून कदाचित नवल वाटेल की त्याही ड्रेसची किंमत एक हजार रुपयांपेक्षा कमीच होती. तो ड्रेस सुदधा अगदी ऐनवेळी विकत आणला होता, कारण लग्नाच्या या गडबडीत मी आधी खरेदी करण्याचेच विसरून गेले होते. आणि तसेही मला कपडे खरेदी करताना जास्त नखरे करणे आवडत नाही.

सिने रसिकांच्या महितीस्तव राधिका आपटे हिचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी झाला होता. २०१२ साली तीचे लग्न व्यवसायाने संगीतकार असलेल्या बेनेडिक्ट टेलर या ब्रिटिश व्यक्तीशी झाले आहे. राधिकाचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. पण ती पुण्यातच लहानची मोठी झाली.

‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातुन तिचा हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. . चित्रपटांमध्ये झळकण्यापूर्वी रंगभूमीवर काम करायची आणि यामुळेच तीचे अभिनय कौशल्य हे वाखाणणी करण्याजोगे आहे. यामुळेच राधिका आपटे ही एक हटके अभिनेत्री ठरते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.