हिंदी सिनेसृष्टी अर्थात बॉलीवुडमधील अनेक बाबी आपल्याला अनेकदा आश्चर्यचकीत करून सोडतात, तर अशाच काही गोष्टींपैकी एक बात म्हणजे, हिंदी सिनेअभिनेत्रींकडे असणाऱ्या महागड्या गाड्या. ज्याप्रमाणे हिंदी सिनेमांमधील अनेक अभिनेते अनेक विविध गोष्टींच आपल्याकडे भारी भन्नाट लग्झरी स्वरूपातलं कलेक्शन करत असतात, त्याचप्रमाणे हल्लीच्या अनेक अभिनेत्र्या देखील तशा काहीशा गोष्टी करताना पहायला मिळात आहेत.

महागड्या गाड्यांच्या खरेदीत ज्या अभिनेत्री आघाडीवर आहेत त्यांच्याबद्दल जरा ही खास बात आपण आज जाणून घेऊयात. सर्वात प्रथम म्हणालं तर ती आहे प्रियंका चोपरा. प्रियंका नेहमीच लाखोंच्या किमतीतील आउटफिट्स वापरत असताना अनेकदा पहायला मिळाली आहे. तर डिझाईनवर अफाट प्रेम असणारी आणि फॅशनचा चांगला गंध असणारी प्रियंका अगदीच 5.65 कोटींच्या किमतीच्या घरातली गाडी वापरत असल्याची पहायला मिळते. प्रियंकाकडे “रॉल्स रॉयस घोस्ट” या गाडीचं मॉडेल आहे. प्रियंकाने ही गाडी नव्याने मॉडिफाई करून घेतली आहे.

यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे, करीना कपूर. पटोदीचा नवाब असलेला सैफ आणि या नवाबची झालेली करीना ही दुसरी पत्नी आहे. जेव्हा गाड्यांच्या सवारीची बात येते तेव्हा करीना अगदी महागातल्या एसयूव्ही वापरणं पसंत करते. तिच्याजवळ महागड्या कलेक्शनमधे “बीएमडब्ल्यू एक्स 7”, ह्या मॉडेलची गाडी आहे. करीनाकडे या गाडीचं पांढऱ्या रंगाचं मॉडेल उपलब्ध आहे.

आता येते ती अभिनेत्री म्हणजे, सध्याच्या घडीला जिचा बॉलीवुडमधे प्रचंड बोलबोला सुरू आहे. आणि तिच्या एकेक नवीन येणाऱ्या सिनेमांचा अक्षरश: धुव्वा उडणार आहे. अर्थातचं ही अभिनेत्री म्हणजे, आलिया भट. आलिया भट सध्याच्या घडीला सिनेसृष्टीतल्या टॉप ५ अभिनेत्रींच्या लिस्टमधे शामील होणारी अभिनेत्री आहे. आलियाचं लग्झरी कारचं कलेक्शन फारच हटके आणि वेगळं आहे. परंतु आलियाजवळ जरी अनेक गाड्या असल्या तरी तिची सर्वाधिक आवडती गाडी म्हणजे, “लैंड रोव्हर रेंज रोव्हर”. या गाडीची किंमत 1.60 कोटींपासून पुढे सुरू होते. आलिया या गाडीमधूनच कायम प्रवास करत असल्याची अनेकदा पहायला मिळते.

यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे, बॉलिवूडच्या आजवरच्या कारकिर्दीत चांगलीच नावारूपाला आलेली अभिनेत्री दिपीका पादुकोन. दिपीका नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि इतर गोष्टींवर बारकाईने विचार करून गोष्टी निवडते. दिपीकाला मर्सिडीजपासून ते ऑडीपर्यंत अनेक विविध गाड्या आवडतात. तिच्याकडील असलेल्या कलेक्शनमधे “मर्सिडीज मेबैज 500” ही गाडी तिची प्रचंड आवडीची आहे. या गाडीची सरासरी किंमत 2.5 कोटींपर्यंत जाते.

मल्लिका शेरावत, या अभिनेत्रीचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलंच असेल. अर्थातचं ही अभिनेत्री एकेकाळी बॉलीवुडमधील अगदी प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री होती. जरी आजकालच्या काळात मल्लिका शेरावत बॉलीवुडमधून गायब झाली असली तरीदेखील तिच्याकडे आलीशान गाड्यांच्या ताफ्यांची मात्र काहीच कमी नाहीये. सिल्व्हर रंगाची “लैम्बोर्गिनी एवटांडौर” ही एकून तब्बल 5 कोटींची आलीशान गाडी तिच्याकडे आहे. या गाडीची एक्झाइज ड्यूटी किंमत लागून भारतीय बाजारात या गाडीची किंमत 8 कोटींच्या घरात जाते.

यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे बॉलीवुडमधील “बार्बी डॉल कॅटरिना कैफ”. कॅटरिनादेखील अनेक चांगल्या लग्झरीयस गोष्टींची शौकीन असल्याची पहायला मिळते. “लैंड रोव्हर रेंज रोव्हर वोज” ही तब्बल 2.37 कोटींची गाडी तिच्या ताफ्यात पहायला मिळते. पांढऱ्या रंगाची ही गाडी कॅटरिनाने नुकतीच 2019 या सालात खरेदी केली होती.

सनी लिओनीला आज तमाम जगातला प्रेक्षक सहज ओळखतो. तिने तिच्या भुतकाळाला मागे टाकत बॉलीवुडमधे जे पाऊलं टाकलं ते ती अजून ठामपणे ठिकवून आहे असं म्हणावं लागेल. सनीलादेखील चांगल्या गाड्यांची योग्य पारख निश्चितच आहे. “मासेराते क्वाट्रोपोर्टे” या फॉरेन कंपनीची तिच्याकडे आलीशान गाडी असल्याची पहायला मिळते.

यानंतर आता येणारी अगदी शेवटची अभिनेत्री म्हणजे, मलायका अरोरा. मलायकाची आवडती कार रेंज रोव्हर एलडब्लूबी ऑटोबायोग्राफी हे मॉडेल आहे. याची किंमत तब्बल 2.51 कोटींच्या घरात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!