बॉलिवुडमधील सिनेजगतातला आजवर एक चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे, फरदीन खान. हा अभिनेता सध्या 47 वर्षांचा झाला आहे. आणि मुळात तुम्हाला आश्चर्य वाटेल की, गेल्या 11 वर्षांपासून सिनेमा न करता तो आजही करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. “प्रेम अगन” या सिनेमातून पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने खुप चांगले सिनेमे सिनेसृष्टीला आजवर दिले आहेत.

आपल्या एकून 12 वर्षांच्या कारकीर्दीच्या काळात जरी फरदीन या अभिनेत्याचा एकही सोलो परफाॅर्मंस असलेला सिनेमा हिट गेला नाही, तरीदेखील त्याच्या इतर सिनेमांनी चांगली प्रसिद्धी आणि पैसाही कमावला. आता गेल्या काही काळापासून जरी हा अभिनेता बॉलिवुडच्या साऱ्याच झगमगाटापासून दूर असला तरीदेखील आपल्या लक्झरी लाईफस्टाईलमधे तो कोणतीही कमी न ठेवता जगत असलेला पहायला मिळतो.

अर्थात तो आजही एका सेलीब्रेटीप्रमाणेच वावरतो. “दुल्हा मिल गया” हा 2010 साली आलेला फरदीन याचा शेवटचा सिनेमा ठरला होता. मागे वेबसाईट द रिचेस्ट व सेलीब्रेटी नेटवर्थ नावाच्या संस्थांकडून जाहिर झालेल्या माहितीनुसार फरदीन खान याच्याकडे सुमारे एकूण 290 कोटींची संपत्ती आहे.

फरदीन या अभिनेत्याकडे मुंबई शिवाय बेंगलुरू या शहरातदेखील कोटींची संपत्ती आहे. फरदीन खान याला तसं पाहता वडिलांचीही संपत्ती वारसा हक्काने मिळालेली आहे. खरतरं फरदीनच्या वडिलांनी बेंगलुरूमधे 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती खरेदी करून ठेवली होती. फरदीनचे वडील फिरोज यांना घोडेसवारीची अत्यंत आवड होती. त्यांनी येथेच फार्म हाऊस आणि इतर बरीचशी जागा खरेदी करून ठेवली होती.

याच जागेवर पुढे चालून फिरोज यांच्या मुलाने अर्थात फरदीन याने गोदरेज कंपनीसोबत करार करत नव्या फ्लॅट्सची निर्मिती केली. तब्बल 12 एकराच्या जागेत अनेक प्लॉट्स आणि व्हिला यांची निर्मिती विक्रीसाठी करण्यात आली. या डिलने फरदीन या अभिनेत्याला एकप्रकारे चांगलाच फायदा झालेला आहे.

यात कंपनीसोबत झालेल्या करारानुसार 50% फायदा हा अभिनेत्याच्या बाजूने राहणार आहे. ज्यामधील काही रक्कम तो व त्याची बहीण लैला हिला मिळणार आहे. बेंगलुरू शहर सोडलं तर मुंबईसारख्या ठिकाणीदेखील फरदीनची चांगलीच बक्कळ संपत्ती असल्याची पहायला मिळते. 2013 साली फरदीनचा एक किस्सा अफाट प्रसारमाध्यमांमधे गाजला होता.

त्याच कारणही काहीसं तसचं होतं. मुळात एका हॉटेलच्या पार्किंग लॉटमधे कितीतरी दिवस फरदीनची मर्सिडीज कार धुळ खात पडली होती. फरदीनचं लग्न नताशासोबत झालेलं आहे. फरदीनने नताशाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, आणि तिच्या होकाराने हे नातं जुळलं. आणि हा रोमॅन्टिक किस्सा थेट एका एरोप्लेन अर्थात विमानात घडला होता. फरदीन याला सध्या दोन मुलं आहेत.

मुलगी आठ वर्षांची तर मुलगा चार वर्षांचा आहे. फरदीन आपल्या कुटुंबासोबत नेहमीच मजेशीर आणि आनंदात टाईम घालवत असल्याच बऱ्याचदा पहायला मिळालं आहे. फरदीनच्या सिनेमा क्षेत्रातील करियरवर नजर टाकायची म्हटलं तर नो एन्ट्री, ओय जय जगदीश, खुशी, शादी नंबर वन, भूत, हे बेबी, ऑल द बेस्ट यांसारखे सिनेमे त्याने केलेले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!