आहान शेट्टी हे नाव तुम्ही या अगोदर कदाचित सोशल मीडियावर काही कारणास्तव ऐकलं असेल. हे नाव अर्थातचं बॉलीवुडमधील एके काळचा राऊडी सुपरस्टार असलेल्या सुनील शेट्टी या अभिनेत्याच्या मुलाचं आहे. सुनील शेट्टी याची सिनेसृष्टीत ओळख सुनील अण्णा अशीदेखील आहे. सुनील शेट्टी कायमच आपल्या रूबाबाने आजवर रसिकप्रेक्षकांची मने जिंकत आल्याचं पहायला मिळाला आहे.

आणि आता सुनील शेट्टी याचा मुलगा अर्थात आहान शेट्टी हा आपल्यला सध्याच्या घडीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेला पहायला मिळतो आहे. आहान शेट्टी एका सिनेमामधून सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याची बातमी मिळाली आहे. हा सिनेमा याच वर्षभरात २४ सप्टेंबर रोजी रिलीज होणार असल्याचीही खबर मिळाली आहे. परंतु एक मुळ मुद्याची बाब म्हणजे त्याचा पहिला सिनेमा येण्याआधीच सर्व सोशल मीडियावर त्याच्या गर्लफ्रेंडची चर्चा अधिक प्रभावीपणे रंगल्याची पहायला मिळते आहे.

शक्यतो एखादा अभिनेता प्रसिद्ध होतो आणि नंतर लोक त्याच्या खाजगी आयुष्यात उत्सुकता दाखवू लागतात परंतु इथे मामला थोडा वेगळाच झाल्याचा पहायला मिळतो आहे. आहानला तसा त्याच्या वडीलांच्या नावाचा एक खंबीर चेहरा आहेच, परंतु तो स्वत: जोपर्यंत सिनेसृष्टीत उतरून पुर्णत: स्वत:ला सिद्ध करू शकणार नाही; तोवर तरी त्याच्या अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह राहिलचं.

आता महत्त्वाची बाब म्हणजे या गोष्टी वगळून आपण जाणून घेऊयात ती व्यक्ती नेमकी कोण आहे, जी आहानमुळे इतकी चर्चेत आली आहे. आणि तिच्यात अशी काय खास खुबी आहे जी की, ती इतकी सोशल मीडियाच्या चर्चेचा विषय ठरू लागली आहे. तर ही व्यक्ती आहे तानिया श्रॉफ. आणि नुकताच तिचा जन्मदिन साजरा झाला आहे.

सुनील शेट्टी अर्थात सुनील अण्णाच्या मुलाने आहान शेट्टी याने तानियाला वाढदिवसाच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यात तानिया श्रॉफ हिच्यासोबतचे आहानचे अनेक फोटो पहायला मिळत आहेत. खरतरं ते दोघेही अगदी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, ते एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. आहान यानेच काही दिवसांपूर्वी एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत तिच्याशी त्याच्या असलेल्या प्रेमाची जाहिर कबुली, “आय लव्ह यू” म्हणतं दिली होती.

या गोष्टीवरूनच नंतर सर्वप्रथम दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. तानियाबद्दल सांगायचं म्हटलं तर ती एक फॅशन डिझायनर आहे. तानिया श्रॉफ आणि आहानची बहिण आथिया शेट्टी यांची चांगलीच मैत्री आहे. मुळात आता आहान लवकरच त्याच्या पहिल्या बॉलीवुडमधील पदार्पणासाठी तयार झाला आहे. या सिनेमाचं पोस्टर आहान याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लॉन्चदेखील करण्यात आलेलं पहायला मिळतं.

या सिनेमात तारा सुतारिया ही अभिनेत्री मुख्य भुमिकेत आहानबरोबर दिसेल, या सिनेमाच नाव “तडप” हे असणार असून हा एक प्रेमकथेवर आधारित सिनेमा असणार आहे. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार असून हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमा “आर एक्स १००” याचा हिंदी रिमेक असणार आहे. आहानचे वडील सुनील शेट्टी याच्याबाबत बोलायचं म्हटलं तर तो नुकताच मुंबई सागा या सिनेमात थोड्यावेळच्या भुमिकेत पहायला मिळाला होता.

त्याला मुंबई सागा सिनेमात पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्या स्वॅगची प्रचंड तारिफ सोशल मीडियावर केलेली पहायला मिळते. दुसरीकडे आता मुळात ही बात म्हणजे, तानिया श्रॉफ आणि आहान शेट्टी जरी एकमेकांच्या रिलेशनशीपमधे असले तरी ते दोघे कधी विवाहबद्ध होतील? हा प्रश्न फार मोठा आहे. साहजिकचं अभिनेता आहानच्या चाहत्यांना तानिया त्याची पत्नी झालेली पहायला आवडेलं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!