आज खरतरं एक खास बात सांगायची म्हटलं तर ती अशी की नव्वदीचं दशक पुर्णत: गाजवणाऱ्या दोन उत्कृष्ट सिनेकलाकार म्हणजेच अभिनेत्री काजोल आणि अभिनेता गोविंदा. आणि वैशिष्ट्य खास असं की दोघांनीही कधीच एकत्र काम केलं नाहीये. मुळात दोघांमधे नाराजी होती अथवा एकत्र काम करायची ईच्छा नव्हती असं कधी झालं नाही.

तरीदेखील नेमक्या कोणत्या कारणास्तव दोघांच एकत्र काम रसिकप्रेक्षकांना पडद्यावरून पहायला मिळालं नाही, याचा खुलासा नुकताच अभिनेत्री काजोल हीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. काजोल म्हणाली की, जंगली नावाच्या एका सिनेमात गोविंदा व काजोल एकत्र पहायला मिळणार होते.

हा प्रोजेक्ट दिग्दर्शक राहुल रवैल बनवणार होते, या सिनेमाकरता दोघांच एकत्रित फोटोशुट देखील पार पडलं होतं. परंतु पुढे काही तांत्रिक अडचणींमुळे हा सिनेमा पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. आणि नंतर कधीही दोघांना एकत्र कास्ट करण्याची तसदी अथवा विचार कोण्याच्याही डोक्यात आला नाही; त्यामुळे ही जोडी पडद्यावर कधीच रसिकप्रेक्षकांच्या नजरेस पडली नाही.

काजोलने दिलेल्या उत्तराने अनेकांना थोडा आश्चर्याचा धक्काही नक्कीच बसला कारण काजोल आणि गोविंदा यांचा एकत्रित चित्रपट येत होता होता राहिला, हाच अनेकांसाठी वेगळा खुलासा ठरला होता. दुर्दैवाने गोविंदा आणि काजोल एका सिनेमात एकत्र नाही तर केवळ फोटोशुट पुरतेच एकत्र पहायला मिळाले. काजोलने मुलाखतीदरम्यान बोलताना गोविंदाच्या अभिनय कौशल्याची बरीच दादही दिली.

नुकतचं काही दिवसांपूर्वी काजोलचा “त्रीभंगा” हा सिनेमा रसिकप्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमातल्या तिच्या भुमिकेचं सर्व माध्यमातून चांगलच कौतुक होत असल्याचं पहायला मिळतं आहे. दरम्यान याच सिनेमाच्या निमित्ताने तिच्यासमोर गोविंदासोबत काम करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. तिच्या त्रीभंगा या सिनेमाला बॉलीवुडमधील उत्कृष्ट अभिनेत्री “रेणुका शहाणे” हिने दिग्दर्शित केलं आहे.

या सिनेमाची निर्मिती स्वत: खुद्द काजोलचा पती अजय देवगण यानेच केल्याची पहायला मिळते. काजोलने गोविंदाच्या विनोदी भूमिकांचीही जबरदस्त तारिफ केल्याची पहायला मिळाली. काजोलला जेव्हा भविष्यात कधी गोविंदासोबत काम करायला जमेल का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने भविष्याची शाश्वती देऊ शकत नाही, पण झालंच एकत्र काम तर उत्तम अशी भुमिकाही मांडली.

काजोलच्या “त्रीभंगा” सिनेमाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून रिलीज करण्यात आलेलं आहे. नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून या सिनेमाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. काजोल आणि गोविंदा हे दोघेही रसिकप्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारे कलाकार राहिले आहेत.

गोविंदाबाबत बोलायचं म्हटलं तर गोविंदा – करीश्मा कपूर, गोविंदा रवीना टंडन या जोड्या पडद्यावर सुपरहीट ठरल्या आहेत. गोविंदाचे अनेक सिनेमे दिग्गज कादर खान यांच्यासोबतही हिट गेलेले पहायला मिळतात. दुसरीकडे काजोलबाबत म्हणालं तर तिचे अनेक सिनेमे शाहरूख खान सोबत सुपरहिट गेलेले पहायला मिळतात. काजोलने बऱ्याच भुमिका आपला नवरा अजय देवगण याच्यासोबतही निभावल्या आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!