बघता बघता सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता तब्बल ५० दिवस झाले… या घराने आतापर्यंत भांडण, अश्रू, वाद – विवाद, मैत्री, प्रेम सगळच पाहिलं आहे… कधी कधी या घरामध्ये सदस्य खूप खुश असतात तर कधी कधी त्यांना एकटे वाटते… पण काही झाल तरी जिंकण्याची, खेळण्याची इच्छा मात्र कमी होत नाही… दर आठवड्याला या घरामधून एक सदस्य घराबाहेर पडतो आणि मग काही वेळ हे घर सुन्न होत… निराश, दु:खी झालेले चेहरे या घरामध्ये वावरताना दिसतात… हे घर प्रत्येक सदस्याला खूप जवळच आहे.

हे घर प्रत्येकालाच काहीना काही देऊन जाणार आहे… या घरातील सदस्यांच्या ५० दिवसाच्या प्रवासावर नेहा शितोळे हिने एक अप्रतिम कविता लिहिली आहे… आणि तिने ती काल सदस्यांना ऐकवून दाखविली… माधव, किशोरीताई, शिवानी, अभिजीत आणि रुपाली त्याक्षणी तिकडे होते आणि त्यांना हि कविता मनापासून नक्कीच आवडली असणार. नेहाने या कवितेमध्ये सदस्यांच्या मनातील भाव भावनांचे खूप सुंदरप्रकारे वर्णन केले आहे… ज्याच्या सुरुवातिच्या आणि शेवटच्या ओळी आहेत “खेळ अजूनही बाकी आहे …. उरले आहे अजून मी पण”