तो आला आणि त्याने पुन्हा जिंकलं… सदस्य आणि प्रेक्षक मागील वर्षापासून ज्या क्षणाची वाट आतुरतेने बघत होते तो क्षण आता आला आहे… बिग बॉस मराठी सिझन 2 च्या आजच्या वीकेंडचा डावच्या भागामध्ये सदस्यांनासरप्राईझ मिळणार आहे…कारण आपल्या सगळ्यांचा लाडका, यारो का यार बॉलीवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे… बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एन्ट्री होणार आहे… सदस्य सलमान खानल बघून खुश झाले त्यांना विश्वास बसत नव्हता की खरोखरच तो मंचावर आला आहे. बिग बॉस मराठी सिझन 2 – WEEKEND चा डाव दोन तासांचा विशेष भाग नक्की बघा आज रात्री ८ वाजल्यापासून आपल्या कलर्स मराठीवर. भाईजान मंचावर येणार म्हणजे दबंगगिरी होणारच… सलमान खान कार्यक्रमामध्ये अनेक आठवणी, किस्से तर सांगणारच आहे पण सदस्यांना तो काय सांगेल ? कोणते सल्ले देईल ? यावर सगळ्यांचे लक्ष आहे… तेंव्हा हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे… 

महेश मांजरेकर यांनी सलमान खानचे मंचावर स्वागत केले आणि मग गप्पा रंगल्या… सलमान आणि महेश मांजरेकर यांची फार जुनी आणि घट्ट मैत्री आहे… महेश मांजरेकर आणि सलमानची मैत्री देखील मंचावर बघायला मिळाली. महेश मांजरेकरांनी त्यांची मैत्री कशी झाली आणि अजूनही ते घट्ट मित्र आहेत याबद्दल संगीतले… सलमान खानने काही लहानपणीचे किस्से आणि आठवणीने सांगितल्या… लहानपणीचे आपल्या सगळ्यांचे काही ना काही किस्से आहेत, आपण असे काही केले आहे ज्याने आपल्याला ओरडा देखील पडला आहे… सलमानने देखील असा एक किस्सा सांगितला जेंव्हा त्याने वडिलांना मिळालेला पगार जाळला, मग पुढे काय झाले ? हे तुम्हाला आजच्या भागामध्ये कळलेच… सलमान खान प्रत्येक गरजू माणसाला मदत करतो आणि त्यांच्या पाठीशी उभे रहातो हे तर सगळ्यांना माहिती आहे… हे अजून एका गोष्टीवरुन लक्षात येते जेंव्हा सलमानने त्यांच्या घरामध्ये घुसलेल्या चोराबद्दल घडलेला किस्सा सांगितला… घरामध्ये घुसलेल्या या चोराचा काय आहे किस्सा ? का त्या चोराने सलमानचे आभार मानले ? जाणून घ्या आजच्या भागामध्ये…

सलमानसोबत रंगला सदस्यांचा संवाद

सलमान खानला भेटण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये खूप उत्सुकता होती आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली… सलमान खानला बघून सदस्यांना सगळ्या गोष्टींचा विसर पडला, त्यांचा आंनद गगनात मावेनासा झाला. ज्या व्यक्तिचे आपण चाहते आहोत तो आज आपल्या समोर आहे ही गोष्टच मुळात सुखावणारी आहे… सलमानने प्रत्येक सदस्याशी गप्पा मारल्या… कार्यक्रमामध्ये सलमानचा मराठी ठसका बघायला मिळणार असून त्याने सदस्यांना देखील सांगितले की मराठी बिग बॉस आहे मराठीमध्येच बोला”…  महेश मांजरेकरांनी सगळ्या सदस्यांची ओळख करून दिली आणि या दरम्यानच अभिजीत बिचुकले यांचा विषय आला… बिचुकलेंनी त्यांनी सलमानचा एक डायलॉग देखील बोलून दाखविला …. मै खुदा किभी नही सुनता… सलमानचे म्हणणे पडले “बिचुकले को आप हिंदी बिग बॉस मे डाल दो”… अभिजीत बिचुकले यांनी संपूर्ण महाराष्ट्रासोबत सलमानचे मन देखील जिंकलेच असे म्हणायला हरकत नाही…

शिवानी सुर्वे सलमानची चाहती आहे जेंव्हा तिची ओळख सलमानशी करून दिली तेंव्हा महेश मांजरेकर म्हणाले मी हिला चित्रपटात घेणार होतो पण आता तर ही घरामध्ये आहे त्यावर सलामनने देखील मजेत सांगितले मी पण घेतले असते…  तिने सलमानला सांगितले तुमच्या घराखाली येऊन मी कित्येकदा गाण गाईले आहे… सलमानने सदस्यांना मोलाचा सल्ला देखील दिला “घरामध्ये असे वागा की बाहेर येऊन काम मिळेल, डोक आणि हृदयचा वापर करून खेळा”. अजून काय काय गप्पा मारल्या ? काय धम्माल मस्ती केली आज नक्की बघा…

…सलमान थिरकरणार त्याच्या आवडत्या गाण्यांवर

सदस्यांमध्ये एक मजेदार गेम खेळण्यात आला ज्यामध्ये त्यांना दिलेली गाणी ओळखायची आहेत… ही सगळी गाणी सलमान खानच्या चित्रपटातील असणार आहेत. चांद छुपा बादल मै, जीने के है चार दिन, प्रेम रतन धन पायो… सलमान खान प्रेम रतन धन पायो या गाण्यातील सिग्नेचर स्टेप्स देखील करणार आहे… याच धम्माल मस्ती मध्ये महेश मांजरेकर आणि सलमान यांच्यामध्ये देखील गेम खेळण्यात येणार आहे ज्यामध्ये त्यांना दिलेल्या सेलिब्रेटीची नावे ओळखायची होती … माधुरी दीक्षित, संजय दत्त,लक्ष्मीकांत बेर्डे, सोनाली बेंद्रे … या दरम्यान सलमानने हम आपके हे कौन सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाली या चित्रपटामधील रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे या सगळ्यांची आठवण आली आणि त्याने काही आठवणी देखील सांगितल्या… महेश मांजरेकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दलच्या काही आठवणी सांगितल्या. 

याचबरोबर Viacom18 स्टुडियोजचा पांघरूण हा नवा चित्रपट लवकरच येणार असून त्या चित्रपटातील गाण्यांची झलक देखील दाखविण्यात येणार आहे आणि सलमान खानचा या चित्रपटामध्ये विशेष सहभाग आहे असे देखील महेश मांजरेकर यांनी सांगितले. बिग बॉस मराठी सिझन 2 – WEEKEND चा डाव आज “भाईजान” सोबत रंगणार असून हा दोन तासांचा विशेष भाग नक्की बघा आज रात्री ८ वाजल्यापासून आपल्या कलर्स मराठीवर.