बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सगळे सदस्य एकत्र येऊन फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करणार असून अजून एक आंनदाचे कारण म्हणजे हे सदस्य आता टॉप ९ मध्ये पोहचले आहेत… एकमेकांशी भांडुन, वाद विवाद करून, आरोप प्रत्यारोप करत, एकमेकांना आधार देत आता सदस्य इथे येऊन पोहचले आहेत… या सदस्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहेत… सगळे हेवेदावे विसरून सदस्य एकत्र आले आहेत… सगळ्यांनी एकमेकांना हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणून हा दिवस डान्स करून साजरा केला… घरातील प्रत्येकासाठीच हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे… कारण या घराने सदस्यांना नवे मित्र दिले आहेत, या घरामध्ये नवी नाती तयार झाली आहेत, ज्यांना सदस्य याआधी ओळखत देखील नव्हते ते आता एकमेकांचे घनिष्ठ मित्र झाले आहेत…

वीणा, अभिजीत, शिव तर शिवानी, नेहा, आरोह, किशोरी शहाणे, बिचुकले असे जरी ग्रुप तयार झाले असले तरीदेखील सदस्य एकत्र येऊन हा दिवस साजरा करत आहेत हे विशेष… हेच या घराचे वैशिष्ट्य आहे… बघूया अजून काय काय केले घरामध्ये ? कसा साजरा केला हा दिवस… तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री 9.30 वा. आपल्या कलर्स मराठीवर.