bhikari-marathi-movie-participation-in-the-movie-nearly-a-1000-artists-from-a-song

‘भिकारी’ चित्रपटातील एका गाण्यात तब्बल एक हजार कलावंतांचा सहभाग

विदया बालन, सलमान खान अशा अनेक बॉलिवुड कलाकारांच्या पाठोपाठ बॉलिवुडचा तगडा कोरिओग्राफर Ganesh Acharya गणेश आचार्यदेखील मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडलेला दिसत आहे. गणेशने यापूर्वी मराठी चित्रपटासाठी कोरिओग्राफी केली आहे.

मात्र यंदा तो  मराठी चित्रपट दिग्दर्शन करणार आहे. नुकतेच त्याच्या  Swami Tinhi Jagacha Bhikari ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या पहिल्या चित्रपटाचा मुहुर्त बिग बी यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता या चित्रपटातील एक सुपरसॉन्ग नुकतेच चित्रिकरण करण्यात आले आहे. या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे या गाण्यात तब्बल एक हजार कलाकारांचा सहभाग आहे.

हे गाणे गणपती बाप्पांवरील आहे.  मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच सुरू झाले आहे. अभिनेता स्वप्नील जोशी Swapnil Joshi , अभिनेत्री ऋचा इनामदार Rucha Inamdar , गुरू ठाकूर Guru Thakur आणि कीर्ती आडारकर Kirti Adarkar यांच्यावर Deva Ho Deva ‘देवा हो देवा’ हे गाणं चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला सुखविंदरसिंग यांचा सुरेख आवाज लाभला आहे.

तसेच हे गाणे मिलिंद वानखेडे आणि विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी राहुल ठोंबरे आणि संजीव होवाळदार यांनी केली आहे. दिग्दर्शक गणेश आचार्यदेखील नेहमीच्या शैलीत गाण्यात दिसणार आहेत.

तीन दिवस या गाण्याचं चित्रीकरण सुरू होते. Gajanana ‘गजानना’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा तामझाम कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला लाजवेल इतका भव्य होता. खास या गाण्यासाठी चाळीस फूट उंचीचा सेट उभारण्यात आला. गणपती बाप्पांची ३५ फुटी मुर्ती ठेवण्यात आली होती. सेटवर ढोलताशा, झांजांचा गजर होत होता. तसंच सतारही वाजवली जात होती. या चित्रीकरणावेळी वातावरण रंगीबेरंगी होऊन गेले होते.

तब्बल २५० मोठ्या घंटा या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत. तसेच या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. मी मराठा एंटरटेन्मेंटच्या शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

swapnil-joshirucha-inamdarguru-thakurkirti-adarka

 

ganesh-acharya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here