मित्रांनो!, छोट्या पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने लोकांचे मनोरंजन करणारी तसेच प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री कॉमेडीयन भारती सिंगची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. द कपिल शर्मा शो च्या नवा सीझनमध्ये भारती सिंग देखील झळकत आहे. नुकताच हा शो ऑन एयर झाला असून भारती सिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारतीने स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत वजन कमी केल्याचे दिसतेय. भारतीचं ट्रांसफॉर्मेशन लूक पाहून सगळीकडे सध्या तीच्या या लूकची चर्चा होत असून अनेकांनी तिची प्रशंसा देखील केली आहे. माहितीनूसार एका मीडिया रिपोर्टने दावा केला आहे की भारतीने तब्बल १५ किलो वजन घटवले आहे.

भारती सिंगचे वजन यापूर्वी ९१ किलो इतके होते. मात्र भारतीने आपल्या डेली हॅबीट्समध्ये परिवर्तन करत वर्कआऊट, डाएट, मेहनत करुन तब्बल १५ किलो वजन किमी केले आहे. यामूळे भातीचे वजन सध्या ७६ किलो इतके झाले आहे. भारतीला स्वत: मधील झालेला हा महत्वपूर्ण बदल पाहून विश्वासच बसत नाहीये. भारती म्हणाली, “मला स्वत:लाच माहिती नाही की कशा प्रकारे मी इतक वजन कमी केलं. तसेच आता मला श्वास घेण्यास काहीच त्रास होत नाहीयो हलक फील होत आहे. याचप्रमाणे डायबिटीस आणि अस्थमा देखील कंट्रोल झाले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

नेमका काय आहे हा भारतीचा डाएट प्लान? चला समजून घेऊया. मित्रांनो! वजन कमी करण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच करावे लागत नाहीत, तर बरेच बलिदान द्यावे लागते. भारतीनेही तेच केले. भारती मधूनमधून उपवास करत असे. तसेच संध्याकाळी ७ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत काहीही खात नाही. ती म्हणते की मागील ३०-३२ वर्षांपासून मी खूप खाल्ल आहे. मात्र लॉकडाऊनने तिला स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्यासाठी व्यायाम आणि डाएट किती महत्वाचा आहे इ. बरेच काही शिकवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारतीने चाहत्यांना तसेच वजन कमी करु इच्छीनाऱ्या व्यक्तींना सल्ला दिला आहे की जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले नाही तर कोणीही तुमच्यावर प्रेम करणार नाही. स्वतःवर प्रेम करणे आणि ते पडद्यावर पाहणे छान आहे. भारतीला स्वतः मधील परिवर्तन पाहून आनंद होत आहे.आणि त्यामूळे तिला स्वतःचा अभिमान वाटत आहे. भारतीने स्वत:च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत वजन कमी केल्याचे दिसतेय. भारतीचं ट्रांसफॉर्मेशन लूक पाहून सगळीकडे सध्या तीच्या या लूकची चर्चा होत असून अनेकांनी तिची प्रशंसा देखील केली आहे.