ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

आपले वडील प्रसिद्ध आणि मोठे अभिनेते असूनही भरत जाधव यांची दोन्ही मुले अतिशय साधी आहेत. एवढेच नाही तर ते मीडिया पासून दूर असल्याचे चित्र देखील दिसून येते. भरत जाधव हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भरत जाधव यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय प्रकल्पांमध्ये काम केले आहे.

नाटक, मालिका, एकांकिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून भरत जाधव नेहमीच प्रेक्षकांसमोर येत असतात. भरत जाधवने आजपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वच स्तरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा नेहमीच होत असते. सोबतच भरत जाधव देखील त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न नेहमीच करताना दिसतात.

भरत जाधव अनेकदा त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबतच सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटो व्हिडिओज ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळतो.
मात्र आता भरत जाधवच्या मुलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. भरत जाधव यांची मोठी मुलगी ही कलाविश्वापासून दूर असून वैद्यकीय क्षेत्रात तिचे नशीब आजमावत आहे.

सुरभी जाधव असे भरत जाधवच्या लेकीचे नाव असून तिने गेल्या वर्षी एमबीबीएसची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली होती. याबाबत भरत जाधवने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. डॉक्टर. सुरभी भरत जाधवने पुण्याच्या एसकेएनएमसी कॉलेजमधून तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सुरभी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. मात्र, भरत अनेकदा त्याच्या लेकी किंवा मुलासोबतचे फोटो शेअर करतो.

त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते असूनही भरतची दोन्ही मुले अतिशय साधी आहेत. एवढेच नाही तर ते प्रकाशझोतापासून फार दूर असल्याचेही दिसून येते.