रवी जाधव दिग्दर्शित ‘बॅन्जो’ या चित्रपटातील ‘बाप्पा’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. गणपती बाप्पावर आधारित ‘बाप्पा’ या गाण्यासाठी अनेक जण आतूर होते. या गाण्याच्या प्रतिक्षेत होते.  रवी जाधव यांचे दिग्दर्शन आणि ‘बाप्पा’ गाणं म्हणजे हे नक्कीच खास आहे.




विशाल ददलानी याच्या आवाजातील ‘बाप्पा’ या गाण्याला विशाल आणि शेखर रावजीआनी यांनी संगीत दिले आहे. ‘बाप्पा’ या गाण्याचे सुंदर बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे नावच ‘बँजो’ आहे आणि ‘बाप्पा’ या गाण्यात रितेश देशमुख बॅन्जो वाजवताना दिसत आहे.

‘बॅन्जो’ चित्रपटात रितेशने साकारलेल्या पात्राचं नाव आहे ‘तराट’, ज्याला आयुष्यात फक्त स्वत:चं नाव आणि इज्जत कमवायची आहे आणि यामध्ये त्याला मदत करते चित्रपटाची हिरोईन नर्गिस फाकरी.

म्युझिकल पण ऍक्शन असा ‘बॅन्जो’  हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here