आजच्या घडीला नाही म्हटलं तर काही जुन्या मालिका आजही नव्याने ताज्या आणि त्यातल्या पात्राशी जोडल्या गेलेली ओढ आपल्याला नवी वाटते. अर्थातचं हे सांगायचं कारण म्हणजे, एका जुन्या मालिकेतील एक अभिनेत्री जिने अगदी कमी काळातचं तिचं पात्र गाजवलं आणि स्वत:ची वेगळी खास ओळख या सिनेसृष्टीच्या जगतात निर्माण केली.
“बालिका वधू” या मालिकेचं नाव तुम्ही ऐकून असालचं. या मालिकेच्या काळात टीव्हीवर येणारी ही मालिका लोकांची पहिली पसंती बनल्या गेली. एखाद्या मालिकेने दिर्घकाळ पहिली पसंती टिकवून राहणं जरा अवघड असतं पण तरीदेखील बराच सलग काळ या मालिकेने चांगलाच उचलून धरला होता.
मोठ्या पडद्यावर ज्या पद्धतीने काही सिनेमे चिरकाळ टिकतात तसं आज काही वर्षांनंतरदेखील छोट्या पडद्यावरीलही काही मालिका लोकांच्या हृदयात कायम घर करून राहिलेल्या पहायला मिळतात, बालिका वधू ही मालिका त्याचंच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. ‘बालिका वधू’ या मालिकेचा साचा हा बालविवाहावर रचला गेलेला होता. त्यामुळे ही मालिका अफाट प्रसिद्ध झाली आणि यातील पात्रेही लोकांना खूप जास्त प्रमाणात भावली.
या मालिकेचं दुसरं वैशिष्ट्य ठरली होती ती म्हणजे कलाकार आनंदी. आनंदीचं पात्र निभावणारी स्त्री कलाकार अगदी लोकांना भावून गेली होती. अविका नावाची ती अभिनेत्री होती जिने आनंदीची भुमिका साकारली होती. आनंदीच्या भुमिकेने तिचं आयुष्य फारचं बदलून गेलं होतं. खऱ्या आयुष्यातही तिला नंतर टोपणनाव आनंदी हेच मिळायला लागलं.
आंनदीच्या अर्थात अविकाच्या बाबतीत आज या साऱ्या गोष्टी बोलणं याकरता कारण हल्ली ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरीच सक्रीय राहू लागली आहे. आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाखो चाहत्यांच्या रोज काही ना काही हटके कमेंट्स तिला मिळालेल्या पहायला भेटत आहेत. लहानपणीच्या आनंदी भुमिका साकारतानाच्या अविकामधे आणि आत्ताच्या अविकामधे फारच कमालीचा फरक झालेला जाणवून येत आहे. त्याचशिवाय खास बाब म्हणजे टेलीव्हिजनच्या माध्यमातून अविका आजवर नेहमीच लोकप्रिय राहिलेली पहायला मिळते.
विशेष म्हणजे, “ससुराल सिमर का” ही प्रसिद्ध मालिकाही तिने आपल्या अदाकारीच्या जोरावर गाजवून सोडली होती. अविकाच्या याच मालिकेत अभिनेता असलेल्या मनीष सोबत तिच्या त्या काळात प्रेमाच्या अफेयर्सच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधे येऊ लागल्या होत्या. दोघांमधील जवळीकता फार वाढल्याचही अनेकांनी वारंवार फोटोंच्या माध्यमातून टिपलं होतं.
अगदी लहान वयात बालपणातच अविकाने हिंदी सिनेसृष्टी अक्षरश: दणाणून सोडली यात काहीच शंका नाही. आजच्या अविका केवळ २३ वर्षांची आहे. तिने इतक्या कमी कालावधीत आपल्या अभिनयाची वाटचाल अगदी सुरळीतपणे चालू ठेवली आहे हे अगदी थक्क करून सोडणारं आहे. अविकाचा जन्म मुळात गुजरात येथे झालेला आहे.
काही दिवसांपूर्वी तिने सिनेसृष्टीपासून थोडासा दुरावा बनवून ठेवलेला पहायला मिळतं आहे. अविकाने एका मुलाखतीदरम्यान तिला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवायची ईच्छा आहे हेदेखील बोलून दाखवलं होतं. आश्चर्याची बाब म्हणालं तर हल्ली अविका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट करण्यामधे अधिक प्रमाणात रमली आहे. इंडोनेशिया या देशात तिची क्रेझ प्रचंड प्रमाणात पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!