‘बाबो’ न उलगडलेली कथा रमेश चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ हा सिनेमा शुक्रवारी (३१ मे) रिलीज झाला. या सिनेमाची मुख्य कथा बबलू (अमोल कांगणे) आणि मुन्नी (प्रतीक्षा मुणगेकर) यांच्यातील असलेल्या प्रेमसंबंध आणि जाती व्यवस्थेवर आधारित आहे. बबलू आणि मुन्नी यांचे एकमेकांवर खुप प्रेम असते, एक दिवस मुन्नीचे वडील (सयाजी शिंदे) हे मुन्नी आणि बबलू यांना सोबत पाहतात आणि त्यांना यांच्या प्रेमाचा उलगडा होतो.

मुन्नीचे वडील हे गावचे तलाठी असतात तर मुन्नी ही उच्च जातीची शिवायतर बबलू हा खालच्या जातीचा असतो. त्यामुळे मुन्नीच्या घरच्यांना यांचं प्रेम मान्य नसतं. दुसरीकडे बबलूचे बाबा मदन (किशोर कदम) हे मुलाला पाठिंबा देण्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. या दोघांना मिळवण्यासाठी अनेक गावकरी प्रयत्न करत असतात.

तसेच गावातील अनेक नागरिक हे ज्योतिषीच्या भविष्यावर विश्वास ठेवत असतात. एक दिवस ज्योतिषी येतो आणि सांगतो की पुढील काही दिवसांमध्ये आपल्या गावावर यान येऊन आदळणार आहे. या भविष्यवाणीनंतर गावकरी गोंधळतात. पुढे काय होतं हे तुम्हाला सिनेमाघरात जाऊन पहावं लागेल.

दिग्दर्शन : रमेश चौधरी याने अभिनय आणि दिग्दर्शन याची धुरा एकत्र सांभाळल्यामुळे दिग्दर्शनात फारशा त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक अनुभवलेले कलाकार असून सुद्धा चित्रपट कुठेतरी कमी वाटतो आहे.

संवाद-कथा-पटकथा : अरविंद जगताप यांनी या सिनेमाचं संवाद लेखन केल असून त्यांच्या कविता आणि पत्र आजपर्यंत विविध माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचली आहेत, मात्र त्यांनी लिहीलेलं संवाद लेखन कसे असेल याची उत्सुकता सर्वांना होती. ‘बाबो’ सिनेमाच्या निमित्ताने ती उत्सुक्ता पूर्ण झाली. सिनेमाचं एकूण संवाद ऐकल्यानंतर प्रेक्षकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे.

अभिनय : अमोल कांगणे याने यापूर्वीदेखील एका सिनेमात काम केलं आहे, तर प्रतीक्षाने तिची भूमिका योग्यरित्या साकारली आहे. बाकी स्टारकास्टने आपल्या भूमिका पद्धतीने मांडल्या आहेत.

गाणी : चित्रपटातील गाणी ही काही ठिकाणी भडीमार झाल्यासारखी वाटतात. तर आणखी चांगली करता आली असती.

“‘स्टार मराठीकडून या सिनेमाला दोन स्टार”

 

Babo Marathi Movie