झी युवावरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तुझं माझं जमतंय’ हि मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. अश्विनी, शुभंकर यांना एकत्र आणण्यासाठी मालिकेत दिलेला पम्मीचा तडका, आणि त्यांचं त्रिकुट हे प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करतंय.
अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे.
अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असून ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या फोटोज आणि व्हिडीओजवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.

तिने नुकतंच सोशल मीडियावर ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतील आशु आणि शुभू म्हणजेच अभिनेता रोशन विचारे आणि अभिनेत्री मोनिका बागुल यांच्यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्यात पम्मी शुभूला आशूला पटविण्याचे फंडे शिकवत आहे. मालिकेत जसं पम्मी आशु आणि शुभूला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतेय त्याचीच झलक तिने या व्हिडिओमधून चाहत्यांना दिली आहे. हा धमाल व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.