मालिका बंद झाल्यावर सुद्धा आपण काही पात्रांना विसरत नाहीत. म्हणजे त्यांचं एवढं गारुड आपल्यावर झालेलं असतं. पण जर काही पात्रांनी एखादी गाजत असलेली मालिका जर अर्ध्यावर सोडली तर ? होय एक प्रसिद्ध अभिनेत्री ने एक मालिका अर्ध्यावर सोडलेली आहे.

त्या मालिकेचं आणि अभिनेत्री च नाव काय ? हे आता आपल्याला जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असेल. तर चला मग जाणून घेऊयात. की जिने मालिका सोडली मग तिच्याही जागेवर कोणती अशी अभिनेत्री आली.

रात्रीस खेळ चाले२ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेनंतर अपूर्वा नेमळेकर हिने झी युवा वाहिनीवरील तुझं माझं जमतंय या मालिकेत पम्मीची भूमिका साकारली आहे. ‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. आणि त्यातल्या सर्वच भूमिका खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. म्हणजे त्यातील त्यात पम्मी म्हणून खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर तिने अचानक मालिका सोडली आणि तिच्या चाहत्यांना ही खूप मोठा ध’क्का बसलेला आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असतं ते तुमचं आमचं सेम असतं. ही मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथेभोवती फिरताना दिसते. यामध्ये रोशन विचारे आणि मोनिका बागुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अपूर्वा नेमळेकर यामध्ये ‘पम्मी’ नावाची सुंदर आणि दिलखेचक भूमिका साकारत होती. परंतु अपूर्वा नेमळेकर आपल्या वैयक्तिक कारणास्तव मालिका सोडत असल्याने मालिकेत मोठा बदल घडून येत आहे. पम्मीच्या भूमिकेत आता अभिनेत्री “प्रतीक्षा जाधव ” झळकणार असल्याने या भूमिकेबाबत ती फारच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे.

देवमाणूस मध्ये मंजुळा म्हणून जी प्रचंड लोकप्रिय झाली ती अभिनेत्री आता तुझं माझं जमतंय मध्ये प्रेमाच्या टिप्स देताना दिसणार आहे.

देवमाणूस या मालिकेतून प्रतीक्षाने साकारलेल्या मंजुळाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.मराठी नाटक , मालिका, चित्रपट याखेरीज हिंदी मालिका तसेच दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रतीक्षा जाधव झळकली आहे. मूळची पुण्याची असलेल्या प्रतिक्षाने कॉलेजमध्ये असताना नाटकांतून काम केले आहे.

तिने अनेक मालिकांत आणि चित्रपट नाटक यात काम केलेले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर छोटी मालकीण, मोलकरीणबाई, मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिका तसेच चला खेळ खेळूया दोघे, तात्या विंचू लगे रहो, जखमी पोलीस, भुताचा हनिमून, सौभाग्य माझं दैवत, खेळ आयुष्याचा हे मराठी चित्रपट तीने साकारले आहेत. दिल ढुंडता है, क्रा’इ’म पेट्रोल या हिंदी मालिकेसोबतच एका दाक्षिणात्य चित्रपटाचाही ती एक महत्वाचा भाग बनली आहे. परंतु या सर्वातून देवमाणूस मालिकेतील मंजुळा ही भूमिका तिच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली आहे या भूमिकेमुळे प्रतिक्षाला प्रसिद्धी तर मिळालीच शिवाय झी युवा वरील मालिकेतून एक तगडी भूमिका साकारण्याची संधी देखील मिळाली आहे.

आता आपल्याला वाटत असेल की जिने म्हणजे अपूर्व नेमळेकर ने मालिका एवढी लोकप्रिय होत असताना ही का सोडली ? तर

अपूर्वा नेमळेकर हिने ही मालिका का सोडली आहे हे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी लवकरच झी मराठीवर रात्रीस खेळ चाले या मालिकेचा सिकवल येणार आहे. त्यामुळे अपूर्वा पुन्हा एकदा या मालिकेत काम करणार आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे. याच कारणामुळे तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे का ? असा प्रश्न तिच्या मालिका सोडण्यामुळे उपस्थित होत आहे. नेमकं घडलं काय हे कळायला हवंच. नाहीतर रसभंग होत असतो.

कारण काहीही असो ते लवकरच प्रेक्षकांसमोर उघड होईल पण तुर्तास अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला नव्याने साकारत असलेल्या पम्मीच्या भूमिकेसाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा…

कारण पम्मी ने भूमिका एका उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. आणि आता प्रतीक्षा ला खूप जोर लावावा लागणार आहे. त्यामुळे तिला खूप शुभेच्छा. तर असं आहे प्रकरण जे एक मालिका सोडून दुसरी मालिका बाबत झालेलं आहे.