सध्या भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रसिद्ध अभिनेत्री बायको फार चर्चेत आहेत. कारण अनुक्षा लवकरच बाळाला जन्म देणार आहे. विराट बाप होणार आहे. अश्यात आपल्या बाळाला कसं सांभाळून घेणार संस्कार कसे असणार ? अश्या सर्व गोष्टी वर अनुष्का व्यक्त झालेली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. पोटात असलेल्या बाळासोबत तिने केलेलं फोटो शूट खूप व्हायरल होत आहे. नेमकं काय प्रकरण आहे, चला तेच सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय कर्णधार विराट कोहली हे लवकरच मम्मी-पप्पा होणार आहेत. येत्या जानेवारी महिन्यात अनुष्का बाळाला जन्म देणार आहे. इतकंच नाही तर बाळाचं संगोपन कशा पद्धतीने करायचं याबाबतही त्यांनी विचार केला आहे.

अनुष्काने वोग मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की ती आणि विराट त्यांच्या बाळाला मीडियापासून दूर ठेवू इच्छितात. त्यांचं बाळ जास्त मस्तीखोर होऊ नये, असं त्यांना वाटतं बाळाचं संगोपन कसं करणार, त्याबाबतही तिने या मुलाखतीत सांगितलं.

मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करण्यासही शिकवले जाते. तुम्हाला मुलांसाठी स्वत: हे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते, असं तिने सांगितलं.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय : अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही.

आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

काही दिवसांपूर्वी तैमुरला मिळणाऱ्या अटेंशनबाबत बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, अनुष्का-विराट हे एक लोकप्रिय जोडपं आहे. जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म होईल तेव्हा पॅपराजी तैमुरला सोडून त्यांच्या मुलांकडे लक्ष देतील.

तर सध्या अनुष्का आणि विराट च्या बाळाची चर्चा जरी खूप चालली असली तरी आम्ही बाळाला सोशल मीडियापासून दुरच ठेवणार आहोत. असं त्यांचं मत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.