मंडळी ग्लॅमरस, मराठी सिनेश्रुष्टीचा स्टाईल आयकॉन, हँडसम असे शब्द ऐकले कि आपल्या  डोळ्यासमोर जे उभे राहतात त्यांपैकी एक अंकुश चौधरी. आजवर अनेक मराठी नाटक, सिनेमे,  मालिकांमध्ये अंकुशने काम केले आणि आज एकविसाव्या शतकात मराठी सिनेश्रुष्टीचा नायक  म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केल.

दुनियादारी मधला डी.एस.पी, असो क्लासमेट मधला सत्या, दगडी चाळमधला सुर्यकांत त्यानी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळला. मंडळी, अंकुशच्या एका सिनेमाने मात्र कित्येक पुरस्कारांवर नाव कोरल तसच तमाम
महाराष्ट्राच्या मनावरही नाव कोरल. तो सिनेमा म्हणजे डबल सीट. मंडळी, डबल सीटच्या आठवणींना उजाळा देण्याच कारणही तसच आहे.

डबल सीटच्या यशानंतर  अंकुशचा एक नवा सिनेमा येतोय ‘ट्रिपल सीट’. नुकताच ‘ट्रिपल सीट’ ह्या सिनेमाच पोस्टरही
सोशिअल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आलं. पोस्टरवर मध्यभागी अंकुश आणि त्याच्या उजव्या  डाव्या बाजूला दोन उभ्या असलेल्या अभिनेत्रींचा अर्धा भाग दाखवला आहे.

लाल ड्रेसमधल्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर बारकाईने बघता नाराजी दिसून येतेय तर उजव्या  बाजूच्या मोरपंखी रंगाच्या ड्रेसमधल्या अभिनेत्रीच्या ओठांवर हलकीशी स्माईल दाखवली आहे.  दोघींच्या मध्ये दोन्ही हातांना कृष्णाच्या बासरीचा आकार देत, चेहऱ्यावर हास्य, पायाची घडी,  मनमोहक रंगाच्या कपड्यांमध्ये दाखवलेला अंकुश. अंकुशच्या फोटोच्यावर ‘ट्रिपल सीट’ अस  सिनेमाच आकर्षक डिझाईनमधल टायटल.

टायटलच्या खाली ‘गोष्ट वायरलेस प्रेमाची’ ही लाईन  आहे. चला, ह्या लाईनवरून आपण किंचित अंदाज तरी लावू शकतोय. गोष्ट प्रेमाची आहे हे तर  नक्की पण आपल्या अंदाजाला फाटे फोडण्यासाठी लाईनमधला ‘वायरलेस’ हा शब्द पुरेसा आहे.  ह्या सिनेमातली प्रेमाची गोष्ट फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशिअल मिडियावरून सुरु झालीये का?

कृष्णाच्या बासरीचा आकार हातांना देत अंकुश उभा आहे त्यावरून सिनेमात अंकुश नाव गोपाल,  कान्हा, कृष्णा ह्यापैकी एक असेल का? एक अभिनेत्री खुश आहे तर एक नाराज आहे अस  दिसतय ह्यावरून अंकुश ह्या दोघींच्या प्रेमात पडला असेल का? नाही मंडळी, अंदाज हा अंदाज  असतो आपला अंदाज खरा ठरतोय का त्यासाठी सिनेमाच बघावा लागणार असो.