सर्वांचे लाडके सिद्धार्थ जाधव आणि अंकुश चौधरी हे अभिनेते, एकमेकांचे खास मित्र आहेत, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. या दोघांची मैत्री हा नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. एकमेकांच्या अडीअडचणीत त्यांनी एकमेकांना दिलेली साथ सुद्धा सर्वश्रुत आहे. यांच्या मैत्रीचा असाच एक खास किस्सा, ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९’च्या मंचावर पाहायला मिळाला. अंकुश आणि सिद्धार्थ यांची ‘जयवीरू’ वाली मैत्री बघताना प्रेक्षकांच्या भावना सुद्धा अनावर झाल्या होत्या.

हँडसम हंक अंकुश अनेकदा ‘फेवरेट स्टाईल आयकॉन’ ठरला आहे आणि याही वर्षी त्याला हा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स असल्यामुळे अंकुशवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात हे कळून येतं आणि अंकुश प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे भारावून गेला. सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, स्वप्निल जोशी आणि आकाश ठोसर हे अभिनेते सुद्धा नामांकन यादीत समाविष्ट होते. पण आपला घनिष्ठ मित्र सिद्धार्थ जाधव, याला ‘फेवरेट स्टाईल आयकॉन’ म्हणून पहिल्यांदाच नामांकन मिळालेले असल्याने, अंकुश खूपच खुश होता.

एवढेच नाही, तर त्याने हा पुरस्कार स्वीकारत असतांना, सिद्धार्थला मंचावर बोलवून घेतले. त्याने हा अवॉर्ड आपला खास मित्र सिद्धार्थ जाधव याच्यासह स्वीकारला. पहिल्यांदा अंकुश सोबत नामांकन मिळाल्यामुळे सिद्धार्थ जाधव खूपच खुश होता, अंकुशने स्वतः हा अवॉर्ड त्याच्यासोबत शेअर करायचे ठरवल्यामुळे सिद्धार्थचा आनंद अर्थातच द्विगुणित झाला. सिद्धार्थने अंकुशचे खूप आभार मानले. या दोघांनी स्टेजवरच एकमेकांना मिठी मारली. दोघेही खूपच भावनाविवश झालेले पाहायला मिळाले.

या दोन खास मित्रांची गळाभेट बघण्याची संधी मिळणार आहे येत्या रविवारी ‘झी टॉकीज’वर! रविवारी १२ तारखेला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पाहायला विसरू नका, संध्याकाळी ६.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी टॉकीज’वर!!!