ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

आज इंडस्ट्रीत एक अभिनेता असा फिट अँड हिट आहे की ज्याचं वय खूप झालेलं आहे. म्हणजे साठी सुद्धा क्रॉस केलेलं आहे. तरी ती आजही तेवढाच आधी सारखा यंग वाटतो. म्हणजे वयच कळून येत नाही.

असा तर तो कोण याचा काहींना अंदाज आलाच असेल आणि काहींना माहीत ही झालं असेल. तरी जाणून घेऊयात. अनिल कपूर त्या यंग सुपरस्टार सेलेब्रिटीचं नाव. जो आणि अनुराग कश्यप सध्या मिळून फिल्म करताय. आणि त्याच फिल्म मुळे अनिल कपूर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे.

सोशल मीडियावर सुद्धा अनिल कपूर फार ऍक्टिव्ह असतो. चाहत्यांना उत्तर सुद्धा देतो. एका गुजरात मधून कॉमेंट करणाऱ्या चाहत्याला अनिल कपूर ने चक्क मराठी मधून उत्तर दिलेलं आहे. जे सध्या खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर AK vs AK या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याच चित्रपटानिमित्त नुकताच अनिल कपूर यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन मला प्रश्न विचारा मी उत्तर देईन असं सांगत अनिल यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलं. मात्र या सर्वांमध्ये त्यांचं एक उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण एका चाहतीने गुजरातीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनिल कपूर यांनी थेट मराठीत उत्तर दिलं आहे.

युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं.

तसेच आपल्या या ५८ सेकंदांच्या व्हिडीओच्या शेवटी तिने अनिल कपूर यांना मला तुम्हाला भेटून तुमची मुलाखत घेण्याची इच्छा आहे असंही म्हटलं. हा व्हिडीओ ट्विट करताना अदितीने तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला.

https://twitter.com/aditiraval/status/1344268089408438273

अनिल कपूर यांनी या ट्विटला उत्तर देताना व्हिडीओमध्ये अदितीने व्यक्त केलेल्या मुलाखत घेण्यासंदर्भातील इच्छेवर भाष्य केलं. मात्र हे उत्तर देताना गुजराती तसेच इंग्रजीमधून बोलणाऱ्या अदितीला मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिलं. “तुम्ही मला बोलवा मी कधीही येईन” असं उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिलं.

https://twitter.com/AnilKapoor/status/1344289907393622016

व्हायरल होत असलेलं अनिल कपूर चं ट्विट मुळे तो पुन्हा चर्चेत आलेला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.