ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

प्रेक्षकांची लाडकी ‘झी युवा’ वाहिनी, दर्जेदार मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी नेहमीच घेऊन येत असते. कार्यक्रमांचे वेगळेपण, ही वाहिनीची खासियत आहे. कार्यक्रमाचे स्पर्धात्मक स्वरूप बाजूला सारून, संगीत आणि गप्पा यांचा संगम असणारी ‘मेहफिल’ या वाहिनीवर सध्या पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यात सुरु झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. क्रांती रेडकर हिचे खुमासदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे. विविध कलाकारांची उपस्थिती त्यांनी संगीताबद्दल मारलेल्या गप्पा आणि सादर केलेली कला यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढते. प्रत्येक भागात संगीतक्षेत्रातील एका उत्तम कलाकाराचा प्रवास अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना ‘मेहफिल’मधून मिळते.

सगळ्यांचे लाडके गायक आनंद शिंदे या ‘मेहफिल’ मध्ये येऊन गेले. अपेक्षेप्रमाणेच या मंचावर सुद्धा त्यांच्या गाण्यांची जादू अनुभवायला मिळाली. ही जादू इतकी प्रभावी होती, की प्रेक्षकांना सुद्धा, आनंदजींना पुन्हा एकदा ‘मेहफिल’मध्ये पाहण्याची इच्छा झाली. प्रेक्षकांचा हा आग्रह लक्षात घेऊन वाहिनीने त्यांना पुन्हा एकदा आमंत्रण दिले. रसिकांच्या प्रेमळ आग्रहाचा मान ठेऊन आनंद शिंदेदेखील पुन्हा एकदा ‘मेहफिल’च्या मंचावर उपस्थित राहिले. त्यांच्या सुरेल आणि जबरदस्त गाण्यांची ‘मेहफिल’ पुढील आठवड्यात पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

त्यांच्या खास गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी आणि दमदार गाण्यांच्या तालावर थिरकण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘मेहफिल’; सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर!!

For More Please Visit Bollywood Movies Viral Kekda