Amruta Khanvilkar to be seen in Karan Johar’s next

803

करण जोहरच्या आगामी चित्रपटात अमृता खानविलकर !
Amruta Khanvilkar अमृता खानविलकर हि मराठी सिनेसृष्टीतील एक अग्रणीय अभिनेत्री आहे. अमृताची वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही. तिच्या सौंदर्याने तिने तरुण मुलांना तिच्या प्रेमात पाडलं आहे. फक्त मुलंच नाही तर तरुण मुली सुद्धा तिला फॉलो करतात. तरुण मुलींसाठी ती एक स्टाईल आयकॉन आहे. गोरा वर्ण, सडपातळ अशी शरीर रचना आणि मनमोहक डोळे यांचा अगदी उत्तम मिलाप म्हणजे अमृता खानविलकर जणू तरुणांच्या स्वप्नातील परी. यासोबतच तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. फक्त मराठीच नाही तर तिने इतर भाषेतील प्रेक्षकांचे सुद्धा मन जिंकले आहे. तिचा चाहता वर्ग हा प्रचंड प्रमाणात आहे. तिच्या नवनवीन कलाकृती पाहण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात आणि त्याला ते नेहमीच चांगला प्रतिसाद देतात.

तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे ती धर्मा प्रोडक्शन निर्मित & राजी & याआगामी हिंदी चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे आणि तिच्या अभिनयाने बॉलीवूड मध्ये तिने तिची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. पण या चित्रपटातील तिची भूमिका उल्लेखनीय अशी असेल. हा चित्रपट अमृता साठी एक उंच भरारी देणारा असेल असे म्हणण्यास हरकत नाही. नुकतंच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे.
चित्रपटात बॉलीवूड मधील अग्रेसर अभिनेत्री आलिया भट्ट आणि उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसतील. चित्रपटाची निर्मिती खुद्द करण जोहर करणार आहेत तर हरहुन्नरी अशा मेघना गुलजार चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.