झी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी सादर करते. सामान्य लोकांना फसवणाऱ्या ठगांना गंडवण्यात कायम तत्पर असलेल्या जोडीची गोष्ट असलेली ‘अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी’ हि मालिका झी मराठीवर नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आणि अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला. आता या मालिकेने ५० भागांचा पल्ला गाठला. हा यशस्वी ५० भागांचा माईलस्टोन मालिकेमधील कलाकरांनी आणि संपूर्ण टीमने केक कटिंग करून साजरा केला.

इतकंच नव्हे तर सर्वांची लाडकी शीतली म्हणजे अल्टी पल्टी मधील पल्लवी, अभिनेत्री शिवानी बावकर हिने रसिक प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील अपलोड केला. प्रेक्षकांनी मालिकेवर केलेल्या प्रेमाबद्दल शिवानीने सगळ्यांचे आभार मानले. हि मालिका असंच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील यात शंकाच नाही.