alia chhiba

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आपल्या फोटोमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहेत.

सुहाना खानच्या चाहत्यांनाही तिची फोटो खूप आवडतात, पण सध्या सुहाना ऐवजी तिची चुलत बहीण चर्चेत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कोण आहे चुलत बहीण ? यर चला मग त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.

आलिया छिबा हे सुहाना खानच्या चुलतबहिणीचं नाव आहे. आलिया छिबा शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा भाऊ विक्रांत छिबा यांची मुलगी आहे. 2 नोव्हेंबरला शाहरुख खानने आपला 55 वा वाढदिवस साजरा केला.

यानिमित्ताने अनेक बॉलिवूड स्टार्स, मित्र आणि चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलिया छिबानेही शाहरुख खानच्या वाढदिवसाबद्दल खास पद्धतीने अभिनंदन केले. त्यामुळे ती चर्चेत आलेली आहे.

आलिया छिब्बाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीमध्ये शाहरुख खान आणि लहान मुलगा अबरामसोबत तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोसह तिने बॉलिवूडच्या किंग खानला कॅप्शन मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आलिया छिब्बा सुद्धा बहीण सुहाना खान सारखीचं सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिचाही बराच चाहतावर्ग सोशल मीडियावर आहे.

आलिया छिबा ही एक फॅशन डिझायनर आहे. तिने बर्‍याच ब्रँडसाठी कपड्यांचे डिझाइन केलेलं आहे. इतकेच नाही तर आलिया छिबाने कोरोना साथीच्या वेळी अनेक मास्क डिझाईन केले आहेत.

गेल्या वर्षी आलिया तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. गेल्या वर्षी कोलकातामध्ये तिचे लग्न झाले. तेव्हा आलियाच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.

आलिया छिबासुद्धा सौंदर्यात सुहाना खानपेक्षा काही कमी नाही. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या फोटोंवरून अंदाज बांधता येईल की आलिया छिबा ही खूप सुंदर आहे. तिचे फोटोही बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.