खिलाडीयोंका खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार सतत कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतो. खास त्याच्या फिटनेसला घेवून लोकं त्याची चर्चा करतात. पण खिलाडी कुमारच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी फार कमी लोकांना माहित आहेत. विशेष म्हणजे त्याचे अभिनेत्री सोबतचे प्रेम प्रकरण.

अक्षय कुमार हे नाव 1990च्या दशक पासून फार चर्चेत आल आहे. चित्रपटातील जबरदस्त स्टंट मुळे अनेकांना तो चाहता बनण्यास मजबुर करत राहिला. आणि त्यासोबत काम करणाय्रा अभिनेत्रीही प्रेमात पडल्या. जुई चावला, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, माधूरी दिक्षीत अशा अभिनेत्री त्याकाळात सर्वात लोकप्रिय होत्या.

त्याच दरम्यान या अभिनेत्रींच्या यादीत एक नविन नाव जोडले गेले ते म्हणजे पुजा बत्रा. पुजा बत्राने “विराट” नावाच्या सिनेमातून बाॅलीवूडमध्ये पहिले डेब्यू केले. विराट चित्रपटातील छोट्याश्या पात्राने अख्या बाॅलीवूडचे लक्ष वेधून घेतले.

पुजाला तिच्या लाजवाब अदाकारी आणि अभिनयामुळे निर्मात्यांची रांग लागू लागली. गोविंदा, संजय दत्त, अनिल कपूर यांसारख्या नायकांसोबत ती काम करत राहिली. त्याच वेळी चर्चा रंगली तिच्या प्रेम प्रकरणांची.

पुजा बत्राचे अक्षय कुमार सोबत दीर्घकाळ प्रेम प्रकरण रंगले. लवकरच ते लग्न ही करणार याची चर्चा होती. पण अचानक दोघांचे आठ वर्षाच्या अफेअर नंतर ब्रेकअप झाले. या मागचे कारण अक्षयचे इतर अभिनेत्रींसोबत असलेले प्रेम प्रकरण असे सांगण्यात येते.

ब्रेकअप नंतर पुजा इतकी मानसिक आजाराने ग्रस्त झाली की तिने बाॅलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला. बोटावर मोजण्याइतके ती चित्रपट करू शकली. पण ती चित्रपटा पासून दूर राहिली आणि अमेरिकेतील एका व्यक्तीशी तिने लग्न केले. तेही लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर तिने 2019 साली नवाब शहाशी लग्न केले.

अक्षय कुमार याचे बाॅलीवूड मध्ये नाव होण्यामागे पुजाचे नाव नेहमीच जोडले जाते. प्रत्येक पुरूषा मागे एका स्त्रीचे हात असते तसे. पण अपयशी प्रेमामुळे एक अभिनेत्रीचे करिअर दावणीला लागेल असे कोणालाच वाटले नव्हते.आज देखील अक्षय कुमारचे नाव लोकप्रिय कलाकारांमध्ये आहे. अक्षय आता कोणत्याच अभिनेत्री सोबत प्रेम प्रकरणात नाही पण तो एक चांगल्या कुटुंबात आनंदी आहे एवढं मात्र खरं.