तेलगु सुपरस्टार नागार्जुन तर आपल्या सगळ्यांना माहितच असेल. नागार्जुन हा खूप ग्रेट अभिनेता आहे. पैसा आणि श्रीमंती तर त्याच्याकडे फार आहे. पण तो स्वभावाने शांत संयम ठेवणारा आहे. तसेच त्याने खूप साऱ्या फिल्म्स अश्या केल्या आहेत की ज्यातून त्याने त्याच्या अभिनयाची झलक दाखवलेली आहे. सध्या त्याची मुलं इंडस्ट्रीत काम करतात पण त्याने याआधी खूप सारं मोठं काम करून ठेवलेलं आहे.
तो एकेकाळी सुपरस्टार होता. तसा तो अजूनही आहेच. आपल्याला त्याच्या आयुष्याबद्दल काही माहितेय ? तो आज जरी यशाच्या शिखरावर असला तरी त्याच्या खूप अश्या गोष्टी आहेत की त्या त्याच्या चाहत्यांना माहित नाहीत. चला तर मग आज आपण त्याच्या आयुष्यातील माहित नसलेल्या गोष्टी जाणुन घेऊयात.
आज नागार्जुन ६१ वर्षांचे झालेले आहेत. २९ ऑगस्ट १९५९ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. १९८६ मध्ये विक्रम या पहिल्या सिनेमातून त्यांनी डेब्यू केला होता. नागार्जुन यांना लहानपणीपासूनचं अभिनयाचं वेड होतं. तेच वेड त्यांनी जोपासलं आणि त्याला एक मोठया यशाची दिशा दिली. बॉलीवूड मध्ये १९९० मध्ये फिल्म शिवा मधून पदार्पण केलं होतं. प्रेक्षकांना त्यांची शिवा मधील भूमिका फार आवडलेली होती.
आजही शिवा हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो. नागार्जुन ने दोन लग्न केलेले आहेत. यासोबतच तब्बू या अभिनेत्री सोबत ही त्यांचे प्रेम सबंध होतं. त्यांचं पहिलं लग्न १९८४ मध्ये लक्ष्मी द्ग्गुबुत्ती सोबत झालं होतं. पण म्हणतात ना की मन जुळे तर आयुष्य जुळतं. त्यांच्या दोघांनी बळच सहा वर्षं काढली. १९९० मध्ये दोघांचा घटस्फो-ट झाला.
१९८० आणि नव्वदच्या दशकात नागार्जुन यांनी त्याकाळी सुप्रसिद्ध असलेली हिरोईन अमाला मुखर्जी सोबत ही काम केलं होतं. त्यावेळी ही त्यांचं प्रेम चर्चेत होतं. सुपरस्टार यांच्या न्यूज ला फार कींमत असते जनमानसात त्यामुळे त्यांची न्यूज शोधण्यासाठी त्यांना मिडिया वाले सतत स्पॉट करत असतात. असं म्हणतात की आमाला आणि नागार्जुन सोबत काम करता करता कधी एकमेकांवर प्रेम करू लागले कळलच नाही. ते खूप त्यावेळी चर्चेत ही होते. या गोष्टीची बहन जेव्हा त्यांची बायको लक्ष्मी पर्यंत गेली त्यामुळे त्यांचा घटस्फो-ट झाला असं म्हणलं जातं.
पहिल्या बायकोसोबत घटस्फो-ट झाल्यावर नागार्जुन यांनीही मानी केलं की आमाला त्यांची खरी प्रेयसी आहे. तिचं आयुष्याची साथीदार बनू शकते. अमाला १९८६ मध्ये तेलगु फिल्म मैथिली एनई काथली प्रेक्षकांना दिसली होती.
१९९२ ला जेव्हा नागार्जुन सोबत तिने लग्न केलं तेव्हा मात्र तिने अभिनय करणं सोडून दिलं. पुढे दोन वर्षांत त्यांच्या घरी पाळणा ही हालला. एका मुलाला अमाला ने जन्म दिला. पहिली बायको लक्ष्मीने ही एका मुलाला जन्म दिला होता.
नागार्जुन ने अमाला सोबत खूप चित्रपट केले. खूप प्रेम ही केलं. त्यांचं प्रेम पुढे टिकलं सुद्धा.जे अजूनही शाबूत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू