श्रवणीय चाल, हळुवार संगीत असलेलं फुल झुलत्या येलीचं हे बस्ता चित्रपटातलं गाणं सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. अजय गोगावले यांच्या बहारदार आवाजातलं हे गाणं रसिकांची दाद मिळवत आहे.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असून सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी “बस्ता” चित्रपट ची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

“बस्ता” या चित्रपटातून एका लग्नाची गोष्ट पहायला मिळणार असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट झालं आहे. तसंच चित्रपटाचं संगीत हेही खास वैशिष्ट्य ठरणार आहे. या पूर्वी सादर केलेल्या पारंपरिक गवळणीनंतर नवं प्रेम गीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.