मित्रांनो! बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आता सिनेसृष्टीत पुर्वीसारखी सक्रिय नसते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिनं जास्त चित्रपटांमध्ये कामही केलेलं नाही. तरीसुद्धा ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झालेली नेहमी पाहायला मिळते. सोशल मीडियावर ऐश्वर्याला फॅन्सची काही कमतरता नाही. ऐश्वर्याशी निगडीत कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. आता सोशल मीडियावर ऐश्वर्याचा तब्बल २७ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ऐश्वर्या एका लहान बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून लोक या व्हिडीओचं कौतुक करत आहेत. ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिचे अनेक फॅन पेजेसही तयार केले आहेत. ज्यावर तिच्याशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. आता तिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. २७ वर्ष जुन्या व्हिडीओत ऐश्वर्या राय ही शाळेतील मुलांशी बोलताना दिसून येत आहे.

या व्हिडिओ क्लिपमध्ये ऐश्वर्या डोक्यावर मुकुट घातलेली दिसते. ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा व्हिडिओ मिस वर्ल्ड झाल्यानंतर रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओच्या एका क्लिपमध्ये ऐश्वर्या रायच्या कडेवर एक लहान मूलही रडताना दिसत आहे. ऐश्वर्या या मुलाला शांत करते आहे. तर दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये ती शाळेतील मुलांना काही वस्तू उपहारस्वरुप वाटताना दिसत आहे.

ऐश्वर्याचा क्यूटनेस आणि दयाळूपणा या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतरही ऐश्वर्या गरीब मुलांमध्ये मिसळते आणि एका लहान मुलाला तिच्या कडेवर उचलते आणि त्याला मायेने शांत करते, असं या व्हिडीओत दिसतंय. आजच्या घडीच्या अभिनेत्रींचा असा स्वभाव नाही. म्हणूनच ऐश्वर्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना फॅन पेजने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, हा व्हिडिओ १९९४ मध्ये ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनल्यानंतर शूट करण्यात आला आहे. मित्रांनो! ऐश्वर्या राय बच्चन २०१८ मध्ये ‘फन्ने खान’ चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिनं बेबी सिंगची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने कोणताही चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये काम केले नाही. आता ती तामिळ चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. २०२२ मध्ये, तिचा तमिळ चित्रपट Ponniyin Selvan हा प्रदर्शित होईल.