उन्हाळा आला कि आपण जागोजागी उसाच्या रसाची गुऱ्हाळे पाहतो. आजकल लोक अनेक प्रकारच्या फळांचे रस पितात. प्रत्येक रसाचे आपले वेगवेगळे फायदे असतात. आज आपण बोलणार आहोत उसाच्या रसाने होणार्या फायद्यांबाबत. तुम्ही सगळ्यांनीच कधी न कधी उसाचा रस नक्कीच प्यायला असेल. जास्तकरून उसाच्या गुऱ्हाळात किंवा जत्रेत लोक हा रस पिताना दिसतात. या रसाने शरीराला बरेच फायदे होतात.

उन्हाळ्यात उसाचा रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे. उसाचा रस फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारापासूनही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते. आज आम्ही तुम्हाला ह्याच फायद्यांची माहिती करून देणार आहोत.

उसाच्या रसात पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. एका अभ्यासात असे कळले आहे कि यात असणार्या पोषक मूल्यांमुळे कैंसर सारख्या घातक आजारांचा धोका टळतो. कैंसरच्या पेशींची वाढ उसाचा रस रोखते. ए पौष्टिक पेय म्हणून तुम्ही उसाचा रस पिऊ शकता.

पण ह्याची काळजी घ्या कि तुम्ही उसाचा रस हा योग्य प्रमाणात पीत आहात. पोटाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास उसाचा रस आपली मदत करतो. यामुळे पोट साफ होते व बद्धकोषतेसारखे अनेक विकार बरे होतात. पित्ताचा त्रास असणार्यांनीही उसाचा रस प्यायला पाहिजे.

शरीरातील पित्त याने दूर होते.उसाचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित अनेक रोगांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. हा प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता कमी होतात. हा रस नियमित प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील धमन्यांचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्यातील मळ बाहेर पडतो व शरीर स्वच्छ होते आणि शरीरात रक्ताचा संचार नीट होतो.

उसाच्या रसाने शरीराला थंडावा मिळतो व शरीरात द्रव्याचे प्रमाण वाढते. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर उसाचा रस नक्की प्या. याने शरीरातली पाण्याची कमतरता भरून येईल व किडनी स्टोन सारख्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. लहान मुलांसाठी तर हे एक उत्तम पेय आहे. उन्हाळा आला कि आपल्या मुलांना उसाचा रस नक्की पाजा. याने त्यांच्या शरीरात थंडावा मिर्माण होईल व पोषण तत्त्वेही शरीराला मिळतील.

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.