मराठी मध्ये धार्मिक कथेवर आधारित मालिका खूप चालतात. कारण रसिकांना त्या आपल्याश्या वाटतात. सध्या अनेक नवीन मालिका लॉ’क डा’ऊ’न नंतर सुरू झालेल्या आहेत. त्यात स्वामी समर्थ यांच्या वर सुद्धा एक आहे. ज्यात काम सगळीच कलाकार खूप भारी करतात.

अश्यात एक अभिनेत्री अशी आहे की तिचं काम सध्या खूप लोकप्रिय होत आहे. आता तिचं नाव काय ? हे जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता लागलेली असेल तर चला जाणून घेऊयात तिचा जीवनप्रवास.

कलर्स मराठी वाहिनीवर २८ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता “जय जय स्वामी समर्थ” ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून पाहायला मिळत आहेत. मालिका आवडत्या आणि भक्ती मार्गाच्या विषयावर असल्याने

स्वामी समर्थांचा जीवनप्रवास नेमका कसा होता हे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांची भूमिका अक्षय मुडावदकर साकारत असून याअगोदर “गांधी ह’त्या आणि मी”, “द लास्ट व्हॉ’ई’स’रॉय” सारखे नाटक तसेच “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकांमधून त्याने काम केले आहे. तर मालिकेत “विजया बाबर” ही नवखी अभिनेत्री स्वामी समर्थांची भक्त साकारत आहे.

विजया बाबर हिच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात…कारण वरवर कुणालाही माहीत असतं पण काही माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यात ही एक वेगळीच मजा असते.

विजया बाबर ही थेटर आर्टिस्ट असून “ड्री’म थेटर मुंबईशी” ती निगडित आहे. ड्रीम थेटर्सच्या अनेक नाटकांतून तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. ड्री’म थे’ट’र्स’ने “सिं’ड्रे’ला”, “शिकस्त ए इश्क” अशा प्रायोगिक नाटकांची निर्मिती केली यात विजया महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. तीने अभिनित केलेल्या ‘शि’क’स्त ए इश्क’ या प्रायोगिक नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून २०१८ साली झी नाट्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

याशिवाय “जिंदगी”, “तू कहा” या म्युजिक व्हिडिओत देखील विजयाने प्रमुख भूमिका बजावली आहे. केवळ अभिनयाच नाही तर मॉडेलिंग क्षेत्र आणि विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये तिने सहभाग दर्शवला यातून २०१८ सालच्या “बेस्ट स्माईल क्वीन महाराष्ट्र” तसेच ब्लि’स झे’स्ट आयोजित नवी मुंबईच्या “मिस ग्लॅमरस अँड स्टायलिश” हे दोन किताबही तीने प’ट’का’व’ले आहेत.

एखाद्या कलाकाराच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळतो तो छोट्या पडद्यावरील मालिकांमधून. विजया पहिल्यांदाच जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकत आहे त्यामुळे ती प्र’का’श’झो’ता’त आलेली पाहायला मिळते.

विजया बाबर हीला या पहिल्या वहिल्या मालिकनिमित्त खूप खुप शुभेच्छा… पहिल्याच भागात मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद तर मिळतोच आहे यापुढेही तो असाच मिळत राहील अशी खात्री आहे.

अश्याच अभिनेत्री या क्षेत्राला लाभू आणि यशाच्या शिखरावर आयुष्याला घेऊन जाऊ.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.