मित्रांनो!, सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या ‘शितली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते.
सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून शितलीची भूमिका खूपच गाजली होती. या मालिकेनंतर शिवानी ‘अलटी पलटी’ या मालिकेत झळकली मात्र ही मालिका अल्पावधीतच आटोपती घेण्यात आली होती. नंतर मग काही व्हिडीओ सॉंगमधून देखील ती आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली होती.
View this post on Instagram
आता शिवानी लवकरच एका मराठी मालिकेतून प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. सोनी मराठी या वाहिनीवर “कुसुम” ही नवी मालिका दाखल होणार आहे. ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज?’… असे म्हणत ही कुसुम आता आपल्या भेटीला येणार आहे. सामान्य घरातली ही कुसुम आपल्या विचाराने माहेरची आणि सासरची नाती घट्ट धरून ठेवताना दिसणार आहे. ‘नुसतं सासर मिरवणं आणि माहेर हरवणं असं कसं चालेल’ असे म्हणून ही कुसुम स्वतः नोकरी करून आपल्या आजारी वडिलांची आणि सासरकडची दोन्ही घरची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
यात तिची होणारी होणारी धावपळ शिवानी आपल्या अभिनयाने चोख साकारेल यात शंका नाही. लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा ‘बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे’, असं सांगते. त्यावर ‘अजूनही तूच करतेस त्या घरचं?’ असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का?’ सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली वाटते. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिवानी बावकर हिच्यासोबत अभिनेत्री “आरती मोरे” ही देखील तिच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तिचा सहकलाकार कोण असेल हे तुर्तास तरी गुलदस्त्यात आहे. या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार दिसणार हे येत्या काही दिवसातच अधिक स्पष्ट होईल. शिवानीने अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिच्या ‘मिरॅकल इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्टिंग ‘ या संस्थेमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
या अॅक्टिंग इन्स्टिट्यूट मधून शिवानी बावकर, निखिल चव्हाण यासारखे अनेक कलाकार घडले आहेत. इथूनच तिला ‘उंडगा’ या चित्रपटात पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती. उंडगा हा तिचा पदर्पणातील पहिला चित्रपट ठरला. अभिनेत्री शिवानी बावकर हिला टीम स्टार मराठी तर्फे “कुसुम” मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा…!!!