ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो!, अल्पावधीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस आणि आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री यांची रोमँटिक सफर ‘मॅड’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. ‘युथ’ या शब्दातच एक वेगळी एनर्जी आहे. तारुण्यात एक वेगळाच मॅडनेस प्रत्येकात भरलेला असतो. या मॅडनेसमधूनच कधी कधी कल्पनेपलीकडच्या अतर्क्य गोष्टी घडत असतात.

असाच अतर्क्य असलेला ‘मॅड’ हा युथफूल, कलरफूल आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय. २०२२ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. मॅडनेस जगण्यात एक कैफ असतो…. हा मॅडनेस तुम्हाला काही मिळवून देऊ शकतो किंवा गोत्यात ही आणू शकतो. वेडेपणाची हीच तुफानी झिंग घेऊन लेखक समीर आशा पाटील आणि दिग्दर्शक निखिल वि. खजिनदार प्रेक्षकांना ‘मॅड’ करायला सज्ज झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमधून त्यांच्या अफाट मॅडनेसची कल्पना येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial)

या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोड़ी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस यांची रोमँटिक सफर ‘मॅड’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. विनायक माळी वेगळ्याच अतरंगी अंदाजात ह्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

आजवर या विनायक माळीने सोशल मीडियावर आपल्या अत्यंत युनिक अशा स्टाईलने दादूस नावाचे पात्र सकारून जो काही धुडगूस घातलाय, त्याला तोडच नाही. आणि आतातर जोडीला ठसकेबाज लव्हेबल रितिका श्रोत्री. मग काय विचारताय? अतरंगी विनायक माळी सह बिनधास्त, सुंदर रितिका… आता हे भन्नाट समीकरण चित्रपटाची रंगत चांगलीच वाढवतील हे नक्की.

डार्लिंग या बहुचर्चित चित्रपटाची टीम तितक्याच उत्साहात ‘मॅड’ हा रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाली आहे. समीर आशा पाटील पिक्चर्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. समीर आशा पाटील आणि व्ही. जे. शलाका हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रितिका श्रोत्री आणि विनायक माळी यांच्या या मॅडनेसची ‘मॅड’ रोलर कोस्टर राइड प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार आहे.