ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो!, शनाया हे नाव मराठी मालिका पाहणाऱ्या सर्वच प्रेक्षकांना सुपरिचित आहे. अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. ही मालिका आता बंद झाली असली तरीदेखील आजही शनाया प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

या मालिकेनंतर रसिका सुनील कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात झळकली नाही. मात्र ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे आणि बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच ‘शनाया’ या नावानं जास्त ओळखलं जातं. विशेष म्हणजे निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिकाने शनाया साकारली होत. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावला होता. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांच्या शनाया पसंतीस पात्र ठरली होती.

रसिका सुनिल आदित्य बिलागीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही नविन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशिअल केलं होतं. दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसले. आता पुन्हा एकदा रसिकाने बॉयफ्रेंड आदित्यसोबतच एक छानसा फोटो शेअर केला आहे.फोटोला समर्क अशी कॅप्शनही दिली आहे.

दोघांचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांचे पुन्हा हार्ट ब्रेक झाले असणार. ​तर दुसरीकडे लाईक्स आणि कमेंट्स करत चाहते फोटोला पसंती देत आहेत. साऱ्या जगापासून दूर आणि कोणालाही जराही कुणकुण लागू न देता गुपचुप गुपचुप दोन दिल एकत्र आले होते. आता प्यार किया तो डरना क्या म्हणत ते करतायत खुल्लम खुल्ला प्रेम.

रसिका सुनील हिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आणि लिहिले की, मी या फोटोच्या प्रेमात पडले आहे. हा फोटो आमच्यातील नात्याबद्दल सांगतो. मी लहान मुलगी असून त्याचा हात नेहमी माझ्या डोक्यावर असतो म्हणजेच नेहमी तो माझ्या पाठिशी कुठेही खंबीरपणे उभा असतो. आदि सर्वोत्तम व्यक्ती आहे. लव यू बिन. आणखी फोटो लवकरच येणार.

ती बऱ्याचदा आदित्यसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या सिनेमात काम केले आहे.