राधिका आपटे या अभिनेत्रीच्या अनेक गोष्टी बऱ्याचदा वादादीत ठरत आल्याच पहायला मिळालं आहे. परंतु त्याखेरीज तिची प्रत्येक गोष्ट ही रोखठोक असते. ती तिचं म्हणणं स्पष्ट आणि न आढेवेढे घेता ठळकपणे मांडून जाते. शिवाय तिने आजवर तिच्या भुमिकांमधून अथवा केलेल्या कामांमधून अनेकांची मने जिंकून घेतली आहेत.

तिने आजपर्यंत केवळ मराठी नाही तर हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमधून काम केलं आहे. तिला कधीकधी सिनेमा इंडस्ट्रीमधील फटकळ बोलून जाणारी अभिनेत्री असं बिरूदही अनेकांनी लावलं आहे. बोल्ड राहणाऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या राधिकाला नेहमीच आपल्या कामातून रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला आवडतं.

शिवाय ती अनेकदा म्हणते, तिच्या सिनेमा अथवा भुमिकांमधून रसिकप्रेक्षकांनी काही ना काही मोलाची गोष्ट सतत शिकत राहिलं पाहिजे. मनाने अगदी रॉयल राहणाऱ्या राधिकाला सध्यातरी नेटीझन्स ट्रो’ल करताना पहायला मिळत आहेत. याच कारण म्हणजे नुकताच तिने शेअर केलेला फोटो. या फोटोशुटमुळे तिला अनेकांनी कमेंट्स करत काही सुचना व सल्लेही दिल्याचं पहायला मिळत आहे.

राधिकाच्या फोटोवर अनेकांनी कपडे कसे घालावेत इथपासून ते तिला तिने अशे फोटोशुट करू नयेत असे सल्ले दिल्याच पहायला मिळालं आहे. राधिका मात्र नेहमीप्रमाणे तिच्या ट्रो’ल’र्स’ना दुर्लक्षित करत असल्याची पहायला मिळाली आहे. आजकाल सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकठिकाणी सेलीब्रेटी या ना त्या कारणास्तव चाहत्यांकडूनही विनाकारण ट्रोल केल्या जातात. अलीकडच्या काळात हे ट्रोलींगच प्रमाण अधिकच वाढलं आहे.

राधिका आपटे या अभिनेत्रीच्या करियरची सुरूवात ही रंगभूमीपासून सुरू होऊन नंतर पुढे आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. हिंदी सिनेमात “वाह लाईफ होतो ऐसी” या सिनेमातून तिने पदार्पण केले. 1985 सालात तिचा जन्म वेल्लूर या ठिकाणी झाला.

तिने केवळ ठराविक मर्यादेत न राहता सर्व दाक्षिणात्य अर्थात तेलुगू, तमीळ, मल्याळम, कन्नड यांखेरीज बंगाली सिनेमा, इंग्रजी फिल्म्स अशा चहुदिशांना आपल्या कामातून वर्चस्व प्रस्थापित केलं आहे, तेही अगदी केवळ वयाच्या 35 व्या वर्षापर्यंतच. सॅक्रेड गेम्स या वेबसिरीजमधेही ती पहायला मिळाली होती. पॅडमॅन, अं’धा’धू’न, कबाली, बदलापूर, पा’र्च’ड अशा सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

तमीळनाडूमधे जन्म घेतलेल्या राधिकाने पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून तिच शिक्षण पूर्ण करून पुढची सिनेसृष्टीतली वाटचाल यशस्वीरित्या सुरू ठेवली. तिचे वडील एक डॉ’क्ट’र आहेत. राधिका आपटे तब्बल आठ वर्षे मेहनत घेत कथक शिकून अगदी त्यात तरबेज झाली आहे.

राधिका आपटेच्या “घो मला असला हवा”, बंगाली “अंतहीन”, “एक इंडियन माणूस”, 2010 साली आलेला “समांतर” सिनेमा, थ्रि’ल’र’चा फिल देऊन जाणारा “द वेटिंग रूम” अशा नानाविध सिनेमांनी रसिकप्रेक्षकांच्या ह्रदयात घर निर्माण केल आहे. राधिका आपटे एका वेगळ्या साच्यातल्या कलाकृतीचं नेहमीच दर्शन रसिकप्रेक्षकांना घडवत असल्याच पहायला मिळालं आहे. ती यापुढे अशाच उत्कृष्ट भुमिका करत राहिल यात काही शंका नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!