आपला काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुलाचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांच्या मुलाचं लग्न हे अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या कझनसोबत पार पडलं. हा विवाहसोहळा अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडल्याचही पहायला मिळालं.

या लग्नाची चर्चा आधीपासूनच सोशल मीडियावर बरीच रंगली होती. पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक याने त्याची गर्लफ्रेंड राहिलेली शाजा मोरानी हिच्यासोबत फायनली लग्नाची गाठ बांधली. दोघांचही लग्न तसं पाहता आधीच २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात कोर्टात पार पडलं होतं. परंतु त्यानंतर आता दोघांचा विवाहसोहळा हा थाटामाटात करण्यात आला आहे.

अर्थातच मालदीव सारख्या भन्नाट ठिकाणी दोन विविध संस्कृतींच्या अधिपत्यात हा सोहळा पार पाडण्यात आला. एक म्हणजे, क्रिश्चियन रिवाजानुसार आणि दुसरं म्हणजे हिंदू संस्कृतीनुसार. तर अशा रितीने एकूणच हे दोघेही विवाहबद्ध झाल्याचे पहायला मिळाले. प्रियांक आणि शाजा यांच्या लग्नातील अनेक फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होऊन चर्चेचा विषय बनून राहिले आहेत. या लग्नात अनेक सेलीब्रेटीदेखील उपस्थित होते.

जुही चावला, जॅकी श्राॅफ, बोनी कपूर, अनील कपूर, श्रद्धा कपूर यांसोबत इतरही सिनेकलाकार याठिकाणी उपस्थित होते. हिंदू संस्कृतीप्रमाणे पार पडलेल्या सोहळ्यात प्रियांकची पत्नी साजाने फिकट जांभळ्या रंगाचा जो लेहंगा परिधान करत, अंगावर दागिन्यांचा साज चढवत या एकूणच पेहरावात जी काही केमिस्ट्री प्रियांकसोबत तिची पहायला मिळते, ती गजबच.

आपल्या मुलाच्या लग्नात सजूनधजून काहीतरी वेगळं करावं किंवा मुलाच्या लग्नात डान्स करावा अशी ईच्छा एखाद्या आईची असू शकते. आणि आई ती पुर्णदेखील करू शकते. पद्मिनी कोल्हापुरे यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरलं झाला तो लग्नाच्या फेऱ्याच्या व्हिडिओच्या साथीने.

ज्यावेळी फेऱ्यांचा व्हिडिओ समोर आला तेव्हा अजून एक व्हिडिओ अपलोड झालेला सोशल मीडियावर पहायला मिळाला, या व्हिडिओमधे पद्मिनी कोल्हापुरे यांनी अगदीच भन्नाट ताल धरत डान्स केला आहे. शक्ती कपूर यांची बायको, आपली बहीण अर्थात शिवांगी आणि तेजस्विनी या दोघींसोबत ढोलाच्या गजरावर पद्मिनी कोल्हापुरेंनी नृत्याचा ठेका धरल्याचं पहायला मिळालं. पद्मिनी कोल्हापुरे यांनी केलेल्या डान्सचं सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे.

सोशल मीडियात सर्व ठिकाणी त्यांचीच चर्चा रंगली आहे. दुसरीकडे आपला भाऊ लग्नबंधनात अडकतोयं याचा आनंद गगनात न मावणारी श्रद्धा कपूर तर थेट लग्नसोहळ्यात जणू आकाशात होती. श्रद्धाने पगडीच्या पेहरावात लग्नसोहळ्यात भरपूर डान्स करत एन्जाॅय केल्याची माहिती मिळाली आहे.

पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आयुष्यावर जर नजर टाकली तर त्यांनी खऱ्या अर्थी एक काळ प्रचंड गाजवला आहे, असं म्हणता येईल. वयाच्या अगदी सात वर्षांच्या असतानापासून त्यांच्या अभिनयाची सुरूवात झाली होती. फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवलेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप बखुबी उमटवली आहे. मुळात पद्मिनी कोल्हापुरे यांनी मराठी हिट सिनेमा “चिमणी पाखरं” यातही महत्त्वाची भुमिका निभावल्याची आपण पाहतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!