गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.

या मालिकेतील शनया मालिकेत जितकी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच ग्लॅमरस आहेत. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ईशानं इन्स्टाग्रामवर काही फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिच्या या फोटोजवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांना प्रचंड भावला आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. ईशा अभिनयावर जितकी मेहनत घेते, तितकीच मेहनत ती फिटनेससाठीही घेते.