चिरतरुण अभिनेत्री रेखाचे आयुष्य हे कायमच चर्चेत राहिलेले आहे. होते. रेखाचं आयुष्य हे काही एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. आणि जेव्हा जेव्हा रेखाचा उल्लेख येतो, तेंव्हा तेव्हा अमिताभ बच्चन यांचे नाव आपोआपच त्याच्याशी जोडले जाते.

एक काळ असा होता की अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रंगलेल्या अफेअरची चर्चा संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये होती. त्यावेळी रणजित, चित्रपटसृष्टीचा प्रख्यात खलनायक होता रणजीत बरोबर त्याकाळचा प्रत्येक मोठा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता काम करण्यास तयार होता, पण रेखाने मात्र त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण दुसरे तिसरे काही नसून होते फक्त अमिताभ बच्चन.

वास्तविक ती अशी वेळ होती जेव्हा रेखा, अमिताभ बच्चन बद्दल खूपच गंभीर होती. जेव्हा ती रणजितबरोबर चित्रपट करत होती, तेव्हा तिला अमिताभबरोबर अधिकाधिक वेळ घालवायचा होता, ज्यामुळे तिने चित्रपटाचे संपूर्ण टाइम टेबलच बदलण्याची मागणी केली आणि दिग्दर्शकाने या अटीशी सहमत नकार दिल्याने रेखाने हा चित्रपटच करण्यास नकार दिला.

९० च्या दशकात सुप्रसिद्ध खलनायक रणजित ‘कारनामा’ नावाचा एक चित्रपट बनवत होता. या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीसाठी रेखाला धर्मेंद्र यांच्या बरोबर त्याने साइन केले होते. रणजितने रेखा आणि धर्मेंद्रच्या शूटिंगची वेळ संध्याकाळी ठेवली होती. पण रेखाला या शूटिंगच्या वेळा मुळीच मान्य नव्हत्या.

त्याचे कारण अमिताभ बच्चन होते. सुरुवातीला रेखाने कोणाकडेही तक्रार केली नव्हती, परंतु तीला आता शूटिंगच्या वेळाच मान्य नव्हत्या. तेव्हा एक दिवस रेखाने रणजितला सांगितले की- “तुम्ही मॉर्निंग शिफ्टमध्ये शूट करू शकाल का?” कारण मला संध्याकाळ अमिताभ बरोबर घालवायची आहे.

रेखा ही रणजितच्या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होती, त्यामुळे आता रणजितच्या मनाविरुद्ध त्याला रेखाची मर्जी सांभाळणे भाग पडत होते. एक प्रतिथयश माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रणजितने स्वत:च या घटनेचा खुलासा केला होता.

या चित्रपटामुळे तो खूप अस्वस्थ असल्याचेही रणजितने आपल्या मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या या सर्व अडचणींची तक्रार त्यांनी थेट धर्मेंद्र यांच्याकडे केली. त्यावर धर्मेंद्र यांनी रणजितला सल्ला दिला की त्यांने चित्रपटात रेखाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला साइन करावे. नंतर रणजितने संपूर्ण स्टारकास्टच बदलून विनोद खन्ना आणि फराह नाझ यांच्यासह हा चित्रपट बनविला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.