ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो! बॉलीवूडच्या या मायनगरीत अनेक बडे कलाकार होऊन गेलेत आणि आजही आहेत. यातील काहीजण लोकांना खुप आवडतात. त्यांच्या लेखी ते स्टार, सुपरस्टार होतात. नवीन कितीही चांगले कलाकार आले तरी रसिकजनांना आपले जुनेच कलाकार प्रिय असतात. अशाच एका तडफदार, दिलखुलास आणि रोखठोक दिग्गज कलाकाराविषयी आज थोडेसे.

भव्य पडदयावर सर्वप्रथम कॅमेरा त्याच्या चकचकीत बुटांवर ओपन होऊन मग मोठ्या रुबाबात हातातला पाईप सावरत पडद्यावर त्यांची एन्ट्री व्हायची आणि त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. टाळ्या आणि शिट्ट्यांनी अख्खं थिएटर दणाणून जायचं. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक स्टार्स आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत होते. पण असा एकच स्टार होता, ज्याला केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने डायलॉगचा ‘राजकुमार’ मानले होते.
होय!, बरोब्बर ओळखलंत!, मी बोलतोय जानी, अर्थात सुपरस्टार राजकुमार यांच्याबद्दल. पडद्यावर राजकुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता.

फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर ते त्यांच्या अटींवर जगले. स्वत:च्याच अटींवर त्यांनी सिनेमे केले. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ८ ऑक्टोबर १९२६ रोजी जन्मलेल्या राजकुमार यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबईतील माहीम पोलीस स्टेशनमध्ये PSI म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एके दिवशी रात्री राजकुमार गस्त घालत असताना एका पोलीस शिपायाने राजकुमारला सांगितले की सर तूम्ही दिसायला आणि उंचीमध्ये हिरो पेक्षा मुळीच कमी नाहीत. तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीत गेलात तर हिरो होऊन भल्या भल्यांची छुट्टी करू शकता.

एका शिपायाने सहज बोललेला हा मुद्दा राजकुमारला आवडला. मुंबईतील पो’ली’स स्टेशन जिथे राजकुमार कार्यरत होते तिथे चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांचे येणेजाणे अनेकदा व्हायचे. असेच एकदा चित्रपट निर्माते बलदेव दुबे काही महत्त्वाच्या कामासाठी पो’ली’स स्टेशनमध्ये आले होते. ते राजकुमारच्या संभाषण शैलीने प्रभावित झाले आणि त्यांनी राजकुमारला त्यांच्या ‘शाही बाजार’ चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याची ऑ’फर दिली. त्या पो’ली’स शिपायाचे म्हणणे ऐकून अभिनेता बनण्याचे राजकुमारने आधीच ठरवले होते. त्यामुळे त्यांनी लगेच आपल्या PSI च्या नोकरीचा राजीनामा दिला आणि निर्मात्याची ऑफर स्वीकारली.

राजकुमारची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या मृ’त्यूपूर्वीच त्यांनी घरच्या सर्वांना कडक सूचना दिल्या होत्या की चित्रपटसृष्टी किंवा प्रसारमाध्यमांतील कोणीही त्यांच्या अं’त्ययात्रेत सामील होऊ नये. त्याच्या ‘तिरंगा’ या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी त्यामागचे कारण सांगितले होते (जे प्रत्यक्ष राजकुमारनेच मेहुल कुमारला सांगितले होते की,) त्यांच्या अं’त्ययात्रेत बॉलीवूड आणि मीडियामधील कोणीही सहभागी होणार नाहीत कारण ते त्यांच्या अं’त्ययात्रेचा एक विनोद, दिखाऊ तमाशा बनवू इच्छित नव्हते.

त्याचे झाले असे की राजकुमार मेहुल कुमारच्या ‘मरते दम तक’ या चित्रपटात स्वतःच्या मृ’त्यूचे दृश्य चित्रित करत होते. ‘जेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या सीनच्या शूटिंगच्या वेळी त्यांना कारमध्ये झोपवले गेले. तेंव्हा मेहुलकुमार यांना राजकुमारनी स्वत:च्या हातांनी फुलांचा हार घालायला लावला अन म्हणाले की आता घाला तुम्ही हार… पण मी खरोखर गेल्यावर मात्र तुम्हाला कळणार पण नाही. त्यावेळी मेहुलकुमार यांनी जास्त प्र’तिक्रिया दिली नाही पण रात्री शूटिंग संपल्यावर त्यांनी राजकुमार यांना कारण विचारले असता, राजकुमार म्हणाले की,

“तुम्हाला माहिती नाही, बॉलीवूडचे लोकं एखाद्याच्या अं’त्यविधीला एक दिखाऊ नौटंकी, तमाशा बनवतात. लोक छान पांढरे कपडे घालून येतात, मग बरेच मीडियाचे लोकही येतात. मृ’त माणसाला आदरांजली देण्याचा नावाखाली ते खोटे बोलणे, रडणे, नसती नाटकं… त्या अं’त्ययात्रेला अक्षरशः एक मजाक बनवले जाते. नकोच ते… माझा अंत्यविधी हा माझा कौटुंबिक मामला आहे आणि तिथे माझ्या कुटुंबाशिवाय कोणीही नसेल.”

मेहुलकुमार यांनी सांगितले की, मृ’त्यूनंतर राजकुमारने खरोखरच स्वतःचे म्हणणे खरे केले. त्यांच्या अं’त्ययात्रेला फिल्म इंडस्ट्री आणि मीडियातील कोणीही नव्हते. आणि अगदी आजही त्याचे अंतिम संस्कार कसे आणि कुठे झाले हे कोणालाही माहित नाही. राजकुमार यांच्या आवाजातील डायलॉग ऐकणं म्हणजे, एक वेगळीच अनुभूती होती.

प्रेक्षक त्यांच्या याच आवाजाचे फॅन होते. याच आवाजाला लोकांनी भरभरून प्रे’म दिले. पण दुर्दैवाने घशाच्या कॅ’न्स’र मुळे दि. ३ जुलै १९९६ रोजी राजकुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकुमार यांना कुणाचीही खोटी सहानुभूती नको होती म्हणून त्यांच्या हुकुमानुसार त्यांचा अं’त्यविधी फक्त कुटुंबातील सदस्यांनीच केला.