नितिश भारद्वाज यांना आज तमाम भारत देश ओळखतो. साहजिकचं त्यांनी गाजवलेली कृष्ण ही भुमिका त्यांच्यानंतर कोणीच अजूनतरी तोडीस तोड साकारू शकलेलं नाही. नितिश भारद्वाज हे अनेक सिनेमांमधून आणि इतर गोष्टीं मधूनदेखील वारंवार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु श्रीकृष्ण हे त्यांच टेलीव्हिजनच्या क्षेत्रातलं गाजलेलं आजवरचं सर्वोत्तम कामगिरी ठरलेलं पात्र म्हणावं लागेल.
नितिश भारद्वाज यांच्या या नव्या प्रोजेक्टची ओढ सर्वांनाच लागलेली आहे. मराठी समांतर या वेबसिरीजमधे पहिल्या सिझनमधे थोड्या स्क्रीनटाईमवरतीही नितिश यांनी आपली भूमिका काहीशी स्पष्ट दर्शवली होती. त्यांच्या वेबसिरीजमधील भुमिकेच्या पुढील वाटचाल पाहण्यास प्रेक्षक फार उत्सुक झालेला पहायला मिळतो आहे. मराठी समांतर वेबसिरीज ही मराठी कादंबरीवर आधारित असलेली गोष्ट आहे.
आणि समांतर अर्थात एका ठराविक अंतरावर काहीतरी अगदी समान हुबेहुब गोष्टी होत राहणं. आणि या सिरीजमधे अगदी तेच दाखवण्यात आलेलं आहे की, एखाद्या दुसर्या व्यक्तीच्या पावलांवर जर तुमचं आयुष्य चालत आहे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात काही गोष्टींशी जुळवूनही घ्यायचयं तर काही गोष्टी अडचणीतही आणत आहेत.
परंतु समजा तुमचं भविष्य तुम्हाला थोडसं लवकर समजलं तर? या जर तरच्या खेळावरच आधारित आता वेबसिरीजचा दुसरा भाग सर्वांच्या भेटीला येत आहे. आणि या भागाकरता सर्वांची उत्सुकता अगदी ताणल्या गेल्याची पहायला मिळते आहे. याखेरीज अनेक वर्षांनंतर एक काहीशा दर्जेदार, वजन असलेल्या भुमिकेत नितिश भारद्वाज पहायला मिळतं आहेत.
समांतर या वेबसिरीजमधे पहिल्या सिझनमधे स्वप्नील जोशी हा मुख्य भुमिकेत पहायला मिळतं होता. सिझन 2 मधेही तोच मुख्य भुमिकेत असणार आहे. याशिवाय यावेळी सई ताम्हणकरचा समावेशही करण्यात आल्याने रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनच ओढ निर्माण झाली आहे. दुसरा सिझन हा 1 जुलै रोजी “एम एक्स प्लेयर” या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पहिल्या भागात तेजस्विनी पंडित हिचेदेखील भुमिका अप्रतिम झाल्याची पहायला मिळाली होती. एकूण वेबसिरीजचा लहेजा आणि मांडणी पाहिली तर ती जबरदस्तच घडवलेली आहे ज्यामुळे रसिकप्रेक्षकांच्या मनावर या मराठी वेबसिरीजने चांगलच अधिराज्य गाजवलं आहे. समांतर वेबसिरीजच्या दुसर्या भागाचा जो ट्रेलर रिलीज झाला आहे तो तब्बल कोट्यावधी लोकांनी अगदी काही क्षणांमधे पाहून घेतला, त्यावरूनच या वेबसिरीजच्या दुसर्या भागाची क्रेझ समजून घेतली जाऊ शकते.
मुळात रसिकप्रेक्षकांच्या कमेंट्सचा वर्षाव जर पाहिला तर अनेकांचा कल अभिनेते नितिश भारद्वाज यांच्याकडे वळलेला दिसून येतो. अनेकांना त्यांच्या त्या लहेजाची, लकबेची भुरळ पडली आहे. आपल्या आवाजातील अगदी धीरगंभीरपणा आणि अभिनय करताना चेहरा व इतर देहबोलीतून दिसणारे हावभाव अप्रतिमच अक्षरश: असं म्हणावं लागेल.
नितिश भारद्वाज यांच्या श्रीकृष्ण या भुमिकेची लोकप्रियता भारतभर गाजली होती तशी यादेखील भुमिकेची दखल सर्वांकडून निश्चितच घेतल्या जाईल. कारण ही वेबसिरीज एकूण जवळपास 4 विविध भाषांमधे प्रदर्शित होणार आहे. नितिश भारद्वाज यांच्या नव्या कणखर भुमिकेसाठी रसिकप्रेक्षकही आता 1 जुलैची वाट पाहताना सज्ज झाल्याचं दिसत आहे. याशिवाय नितिश भारद्वाज आणि स्वप्नील जोशी यांच्यावर सोशल मीडियावर चांगलाच कौतुकाचा वर्षावही होत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!