बॉलिवूड अनेक लोकांसाठी स्वप्न नगरी आहे. फुल पॅक ऍक्शन चित्रपटांपासून तर खळखळून हसवणाऱ्या चित्रपटांपर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट नेहमीच लोकांच्या भेटीस येतात. ह्या चित्रपटातील कलाकार पुढे स्टार्स, सुपरस्टार्स होतात आणि फक्त त्यांच्या नावावर चित्रपट चालायला लागतात.

भारतातील बॉलिवूड चित्रपट उद्योग हा जगातील काही नामवंत उद्योगांपैकी आहे. पण तुम्हाला माहिती का एका चित्रपटासाठी तुमचे आवडते कलाकार चक्क कोट्यावधी रुपये घेतात. चला तर जाणून घ्या तुमचे आवडते कलाकार आणि त्यांच्या एका चित्रपटासाठी ते घेणारं मानधन.

अक्षय कुमार : खिलाडी कुमार नावाने प्रसिद्ध असणारा अक्षय कुमार, बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सध्या त्याच्या वेगळ्या विषयांवरच्या आणि सामाजिक आशय असणाऱ्या चित्रपटांमुळे समीक्षकाद्वारे आणि प्रेक्षकांकडून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. अक्षय कुमार एका चित्रपटासाठी तब्बल 128 कोटी रुपये घेतो.

सलमान खान : तीन दशकांहून अधिक काळपर्यंत चित्रपट व्यवसायात वर्चस्व गाजवत असलेला सलमान खान गेल्या काही व काळापासून आश्चर्यकारक यश मिळवत आहे. तो एका चित्रपटासाठी 105 कोटी रुपये इतका प्रचंड मोबदला घेतो.

शाहरुख खान : देश आणि परदेशात प्रचंड लोकप्रियता मिळवणारा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख ह्या स्पर्धेत काहीसा मागे आहे असं वाटतं. झिरो नंतर शाहरुखचा एकही चित्रपट आला नसला तरी शाहरुख एका चित्रपटासाठी 88 कोटी रुपये पर्यंत मानधन घेतो.

चित्रपटांच्या मानधनाबाबत बॉलिवूड अभिनेत्री ही काही मागे नाहीत. आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ  करण्याऱ्या तर कधी आपल्या नावावर चित्रपट चालवण्याऱ्या ह्या अभिनेत्री ही कधी कधी पुरुष सहकाऱ्यांपेक्षा जास्त मानधन घेतात.

दीपिका पादुकोण : दीपिका पादुकोण हिने यशस्वीरित्या प्रेक्षकांच्या मनात आपला एक ठसा उमटविला आहे. दीपिका सध्या बॉलिवूड मध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. नुकतंच तिने प्रभास आणि शाहरुख खान यांच्यासमवेत तिचे आगामी चित्रपट 29 करोडमध्ये साईन केले असल्याची चर्चा आहे.

श्रद्धा कपूर : स्त्री, हैदर आणि छिचोरे यासारखे अनेक समीक्षात्मक चित्रपट देणारी श्रद्धा कपूर ही या पिढीतील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. कोणत्याही मोठ्या स्टारबरोबर एकही चित्रपट नसला तरीही, ती आपल्या कामाद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. श्रद्धा एका चित्रपटासाठी 26 कोटी रुपये इतकं मानधन घेते.

आलिया भट्ट : स्टुडंट ऑफ दि इयर मधून पदार्पण केलेली महेश भट्ट ह्यांची लेक आलिया अनेक तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. सध्या आलेले कलंक आणि सडक २ सारख्या चित्रपटात दिसून आलेली आलिया एका चित्रपटासाठी जवळजवळ 23 कोटी रुपये एवढं मानधन घेते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.