ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक किस्से आपल्याला ऐकू येत असतात. अगदी त्याचप्रमाणे अभिनेता आमीर खान याने आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फो’ट घेऊन सर्वांना एक जबरदस्त धक्का दिला आहे. आमीरने किरण राव सोबतचा आपला 15 वर्षांचा संसार मो’ड’ला आहे. एवढंच नव्हे तर त्याने याआधी आपली पहिली पत्नी रीना दत्त हिच्यासोबत देखील 16 वर्षांच्या संसारानंतर घटस्फो’ट घेतला होता.

तर आता आमीर खान व किरण राव यांच्या घटस्फो’टानंतर त्याची पहिली पत्नी रिना दत्त ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हांला रीना दत्त विषयी आणखी माहिती सांगणार आहोत. रीना सध्या काय करते, ती कशी दिसते, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असाल.

बॉलीवुड अभिनेता आमीर खान यांना इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. पण त्याची पर्सनल लाइफ वाटते तेवढी परफेक्ट मुळीच नाही. कारण तुम्हांला ठाऊक आहे का, 30 वर्षांत आमीर खानचे दोन संसार मोडले आहेत. नुकतेच त्याने आपली दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत सुद्धा घटस्फो’ट घेतल्याचे समजले आहे.

मीडियाच्या माहितीनुसार आमीर खानसोबत घटस्फो’ट घेतल्यावर रीना दत्त ही नोकरी करत आहे. त्याचप्रमाणे ती आपल्या दोन्ही मुलांचा अतिशय उत्कृष्टपणे सांभाळ करत आहे. घटस्फो’टानंतर देखील रीना व आमीर खान यांचे एकमेकांसोबत चांगले संबंध राहिले आहेत. हे दोघेही एकमेकांच्या आनंदाच्या क्षणी आवर्जून उपस्थित असतात. तसेच ते दुःखात सुद्धा एकमेकांची साथ निभावतात.

इतकंच नव्हे तर आमीर खानची दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत सुद्धा रिना दत्तचे मैत्रीचे संबंध होते. शेवटी रिना दत्त हिला 2019 मध्ये पाहण्यात आले होते. तेव्हा ती तिचा वाढदिवस साजरा करताना दिसली होती. त्यावेळी आमीर खान व किरण राव हे पण तेथे उपस्थित होते.

परंतु त्यानंतर रीना दत्त ही पुन्हा पाहण्यात आलीच नाही. एवढंच नव्हे मागील 5 वर्षांपासून तिचा एक फोटो सुद्धा सोशल मीडियावर दिसला नाही. तसेच मुलगा जुनैद आणि मूलगी आयरा हिने सुद्धा आपली आई रीनाचा एक सुद्धा फोटो शेयर केला नाही. आमीर व रीनाचा हा मुलगा लवकरच बॉलीवुड मध्ये पदार्पण करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.